देशात नागपूरचाच वाजणार डंका! ...असे का म्हणाले Devendra Fadnavis?

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

नागपूर (Nagpur) : पिण्याच्या पाण्याची सोय, आंतरराष्ट्रीय मानकानुसार घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो टप्पा-2 द्वारे लगतच्या शहरांना जोडणे, शहराला लॉजिस्टिक कॅपिटल म्हणून विकसित करणे, शहराला खड्डेमुक्त करणे आदी उपाययोजनांद्वारे नागपूरला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याचा मानस उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला.

नागपूरच्या सेंटर पाँईट हॉटेलमध्ये फडणवीस यांच्या उपस्थितीत क्रेडाई नागपूर मेट्रोच्या वर्ष 2023-25 साठी नवनियुक्त कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला होते. या प्रसंगी ते बोलत होते. 

Devendra Fadnavis
Nashik:बजेटमधील फ्लॅट खरेदी करायचाय! डिसेंबरमध्ये मिळणार गुड न्यूज

फडणवीस यांनी सांगितले की, मागील दशकापासून नागपूर शहर बदलत आहे. या शहराने नुकताच सौंदर्यीकरण व स्वच्छतेसाठी राज्यातील पहिला पुरस्कार पटकाविला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात या शहरासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. शहरात पिण्याच्या पाण्याची योजना अंतिम टप्प्यात आहे. मलनि:सारणात नागपूर शहर अन्य शहरांच्या पुढे आहे. नुकताच महानगर पालिकेने स्विडीश कंपनी सोबत करार केला असून, येत्या 18 महिन्यात आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे नागपूर शहरात घनकचरा व्यवस्थापनाचे कार्य सुरू होणार आहे.

Devendra Fadnavis
PWDचे पुढचे पाऊल; सर्व रस्त्यांचा लेखाजोखा फक्त एका क्लिकवर

रियल इस्टेट क्षेत्रामुळे रोजगाराची मागणी निर्माण होत असते. म्हणूनच सरकारचेही या क्षेत्राकडे  लक्ष आहे. नागपुरात जवळपास 40 कि.मी. परिसरात मेट्रोरेल्वेचे जाळे निर्माण झाले आहे. मेट्रो टप्पा-2 द्वारे लगतच्या उपनगरीय भागाला जोडण्यात येणार आहे. अन्य क्षेत्रांप्रमाणे रियल इस्टेट क्षेत्रालाही याचा फायदा होणार आहे. वाळूचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकार लवकरच नवीन उपाययोजना राबवणार आहे. यामुळे सर्वांना वाळू उपलब्ध होईल. भारतात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. यासाठी भौगोलिकदृष्ट्या केंद्रस्थानी असलेल्या नागपूर शहराला लॉजिस्टीक कॅपिटल म्हणून विकसित करण्यात येणार, असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

Devendra Fadnavis
'हे' ठाणेकरांसाठी मुख्यमंत्र्यांचे सर्वांत मोठे गिफ्ट ठरणार का?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावर दोन धावपट्ट्या सुरू करण्यात येणार आहेत. तसेच येत्या काळात उत्तमोत्तम रस्ते निर्मिती करून नागपुरात खड्डे मुक्त शहराची संकल्पना राबविण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. क्रेडाई नागपूर मेट्रोच्या नवीन कार्यकारणीला जोमाने काम करण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com