Nashik:बजेटमधील फ्लॅट खरेदी करायचाय! डिसेंबरमध्ये मिळणार गुड न्यूज

Housing Society
Housing SocietyTendernama

नाशिक (Nashik) : अक्षयतृतीया मुहूर्त साधत शहरात दोनशेहून अधिक नवीन प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले. विशेष करून बजेट फ्लॅटचे मागणी लक्षात घेता अशा प्रकल्पांचे मोठ्या प्रमाणात उद्‌घाटन झाले. डिसेंबर अखेरपर्यंत शहरात मोठ्या प्रमाणात सदनिका उपलब्ध होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Housing Society
Mumbai: 96 KMच्या सी-लिंकच्या कामाला गती; MMRDAने काढले टेंडर

नाशिकमध्ये घरांची मागणी लक्षात घेऊन अक्षयतृतीया मुहूर्तावर नवीन प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले. हजाराहून अधिक सदनिकांची उलाढाल झाल्याचे बोलले जात आहे. अक्षयतृतीया मुहूर्तावर जवळपास १०० कोटींची उलाढाल होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Housing Society
Nashik : फाळके स्मारकाच्या विविध शुल्कामध्ये दुप्पट वाढ!

राज्य सरकारने नाशिकसाठी रेडीरेकनरच्या दरात कुठलीही वाढ केलेली नाही. मुद्रांक शुल्कदेखील जैसे थे असल्याने त्याचाही परिणाम खरेदी विक्रीच्या नोंदणीवर होणार आहे. वडाळा शिवार, नाशिक रोड, जेल रोड, पाथर्डी, अंबड, मखमलाबाद या शहराच्या बाह्य भागांमध्ये नवीन प्रकल्पांचे उद्‌घाटन मोठ्या प्रमाणात झाले.

"राज्य शासनाने रेडीरेकनरचे जैसे- थे ठेवलेले दर, बाजारात घरांना असलेली मागणी लक्षात घेता अक्षयतृतीया मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात प्रकल्पांचे उद्‌घाटन झाले. नाशिकच्या विकासाला याचा नक्कीच फायदा होईल."

- कृणाल पाटील, अध्यक्ष, नाशिक, क्रेडाई मेट्रो

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com