Nashik : खासदार गोडसेंचा 376 कोटींचा रोपवे संकटात, कारण...

Ropeway
RopewayTendernama

नाशिक (Nashik) : ब्रह्मगिरी ते अंजनेरी या ५.७ किलोमीटर लांबीच्या रोप वेला नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. अंजनेरी पर्वतावर गिधाडांचा अधिवास असून या रोप वेमुळे गिधाडांचा अधिवास नष्ट होईल, या भीतीने या प्रस्तावित रोप वे विरोधात निदर्शने करण्यात आले. यामुळे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांनी प्रस्तावित केलेला ३७६.७३ कोटींचा प्रकल्प पर्यावरणाच्या कारणामुळे संकटात सापडण्याची शक्यता आहे.

Ropeway
BMC : जम्बो कोविड सेंटर टेंडर प्रकरणी आयुक्तही अडचणीत?

त्र्यंबकेश्वर ययेथील अंजनेरी ते ब्रह्मगिरी या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून भारत सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीकडून साकारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी ३१ जुलैपर्यंत टेंडर मागवण्यात येणार असल्याचे खासदार हेमंत गोडसे यांनीनुकतेच सांगितले होते. यापूर्वी प्रकल्प प्रस्तावित केला जात असताना अनेक पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी याला विरोध करूनही खासदार हेमंत गोडसे यांनी तो प्रकल्प पुढे रेटून नेला आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीने प्रस्तावित अंजनेरी -ब्रह्मगिरी रोप वे प्रकल्पाची टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे. खासदार गोडसेयांनी सांगितल्यानुसार रोपवेच्या कामाविषयीचे टेंडर कंपनीने ३१ जुलैपर्यंत मागवले असून आता लवकरच रोप वे प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. तसेच कार्यादेश दिल्यानंतर २४ महिन्यांत काम पूर्ण केले जाणार आहे. यामुळे पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या रोपवेला विरोध केला आहे. प्रस्तावित रोपवेचे कामकाज थांबवा, जटायू वाचवा, असा नारा देत नाशिक शहर- त्र्यंबकेश्वर येथील पर्यावरणप्रेमीनी एल्गार पुकारला.

Ropeway
Nashik: ओल्या कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प पुन्हा ठप्प, कारण..

अंजनेरीची जैवविविधता, ब्रह्मगिरीची पवित्रता अबाधित राखण्यासाठी मेटघर ग्रामस्थ, त्र्यंबकवासी, पर्यावरणप्रेमी एकवटले आहेत. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी मेटघर निवासी, त्र्यंबकवासी, महंत गिरिजानंद सरस्वती महाराज (आनंदआखाडा, त्र्यंबकेश्वर), मेटघरचे सरपंच झोले, ललित लोहगावकर, प्रकाश दिवे, कैलास देशमुख, हरित ब्रह्मगिरी सदस्य रमेश अय्यर, कुलदीप कोर, डॉ. संदीप भानोसे, भारती जाधव, अरविंद निकुम, जगबीर सिंग, नितीन रेवगडे, जयेश पाटील, सूरज अकोलकर, हेमंत जाधव, शिवराज रेवगडे, टीम वृक्षवल्ली, पांजरपोळ ग्रुप व इतर अनेक दोनशेहून अधिक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी जटायू पूजन करून या अभियानाची सुरवात करण्यात आली.

Ropeway
Nashik: पालकमंत्री दादा भुसे झेडपी प्रशासनावर का संतापले?

खासदारांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करून केंद्र सरकारची दिशाभूल केल्याचा पर्यावरणप्रेमींचा आरोप आहे. जगविख्यात अतिदुर्मिळ जैवविविधतेसाठी प्रसिद्ध अंजनेरी पर्वतला अभयारण्य घोषित करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असताना रोप वेसारख्या जैवविविधतेस धोकादायक ठरणाऱ्या प्रकल्पाचे स्वप्न बघणे चुकीचे ठरेल. लाखो भाविकांच्या पायी वारीच्या धार्मिक परंपरेने ब्रह्मगिरी समृद्ध असताना पर्यटन वाढीसाठी निसर्गाचे नुकसान करून रोप वे करण्याची गरजच काय, असा पर्यावरणप्रेमींचा प्रश्न आहे. अंजनेरी, ब्रह्मगिरी येथील जंगल वाचवण्यासाठी ग्रामस्थ व पर्यावरणप्रेमी लवकरच वनमंत्र्यांना भेटणार आहेत. रोपवेविरुद्धचा लढा तीव्र आंदोलन करून अधिक बळकट करण्याचा निर्णय सर्व निसर्गप्रेमी व ग्रामस्थांकडून घेण्यात आला.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com