Nashik : सिंहस्थ आराखड्यात पाणी पुरवठ्यासाठी हजार कोटींच्या योजना

Kumbh Mela
Kumbh MelaTendernama

नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी प्रारुप आराखडे सादर केले आहेत. त्यात पाणीपुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखड्यात नवीन जलवाहिनी, वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण, जलशुद्धीकरण केंद्र उभारणे व सिंहस्थातील साधूंसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जवळपास हजार कोटींच्या योजनांचा समावेश केला आहे. सिंहस्थाच्या निमित्ताने अनेक वर्षांपासून प्रस्तावित असलेल्या दारणा धरणातून थेट जलवाहिनी योजनेचाही यात समावेश आहे.

Kumbh Mela
महाराष्ट्रातील महावितरणचे 14 हजार कोटींचे कामही अदानी समूहाला!

नाशिक येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने महापालिका आयुक्तांच्या सूचनेनुसार जवळपास ४३ विभागांनी प्रारूप आराखडे सादर केले असून त्यांच्या पडताळणीनंतर एकत्रित अहवाल अंतिम केला जाणार आहे. महापालिका ऑक्टोबरमध्ये शासनाला अंतिम प्रारूप आराखडा सादर करणार आहे. महापालिकेच्या पाणी पुरवठाविभागाने जवळपास एक हजार कोटी रुपयांचा प्रारूप आराखडा तयार केला आहे. यात प्रामुख्याने दारणा धरणात नाशिक शहरासाठी आरक्षित असलेले पाणी दारणा नदीतून उचलण्याऐवजी दारणा धरणातून थेट पाईपलाईन योजनेचा समावेश केला आहे.

Kumbh Mela
Mumbai : 'या' 4 स्टेशनवर लवकरच सिनेमा थिएटर; मध्य रेल्वेचा पायलट प्रोजेक्ट

नाशिक शहरासाठी २०३१ पर्यंत दारणा धरणात एक टीएमसी पाणी पिण्यासाठी आरक्षित केले जाणार आहे. मागीलदोन वर्षांपर्यंत तीनशे दशलक्ष घनफूटपाणी आरक्षित केले जात होते. मात्र, दारणाच्या चेहेडी पंपिंग स्टेशन येथून दुर्गंधीयुक्त पाणी उपसा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या त्यामुळे सध्या दारणा नदीतून पाणी घेतला जात नाही. याचा ताण गंगापूर व मुकणे धरणावर पडत असतो. यामुळे दारणा धरणातील पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी थेट जलवाहिनीद्वारे नाशिकरोड येथे आणण्याची योजना या सिंहस्था मार्गी लावली जाणार आहे. यामुळे सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकरोड परिसरातील रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. आराखड्यातील तरतुदीनुसार दारणा धरणावर पंपिंग स्टेशनची उभारणी, पंपिंग स्टेशन ते जलशुद्धीकरणकेंद्रापर्यंत थेट जलवाहिनी या कामांचा समावेश केला आहे. त्याप्रमाणे सातपूर येथील बारा बंगला व पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रांवर पंपिंग स्टेशन्सचे अत्याधुनिकीकरण व सक्षमीकरण केले जाणार आहे.

Kumbh Mela
Nashik ZP : सरकारने नाक दाबताच 117 कोटी अखर्चित केले परत

वितरण व्यवस्थेत सुधारणा होणार
नाशिक शहरातील सध्याची पाणी वितरण व्यवस्था जुनी झाली असून जवळपास ४० टक्क्यांच्या आसपास पाणी गळत होत असल्याचे सांगितले जात असते. यामुळे सिंहस्थाच्या निमित्ताने वितरण व्यवस्थेतही सुधारणा करण्याच्या कामांचा आराखड्यात समावेश केला आहे. त्यानुसार अस्तित्वातील पाणीपुरवठा वितरण यंत्रणेची क्षमतावाढ, नवीन पाइपलाइन, जलशुद्धीकरण केंद्रांची निर्मिती या कामांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकरोड सह विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र येथे १३७ दिवसाला दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारणे, विल्होळी साठवण टाकीपासून गांधीनगर, नाशिकरोड व पंचवटीतील साधुग्राम पर्यंत १हजार ८०० मिलिमीटर व्यासाची ५० किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी टाकणे, साधुग्राम मध्ये २० दशलक्ष लिटर क्षमतेचे २० मीटर उंचीचे जलकुंभ उभारणे, साधुग्राम व भाविक मार्गावर ६०० ते १५० मिलिमीटर व्यासाची १८ किलो मीटर लांबीची मुख्य वाहिनी टाकणे, मुख्य व शाखा वितरण वाहिनी टाकणे या कामांचा समावेश आराखड्यात करण्यात आला आहे.

असा लागणार निधी
जलशुद्धीकरण केंद्र व जलवाहिनी टाकणे : ६८० कोटी रुपये.
 साधुग्राममध्ये जलवाहिन्या टाकणे : २४० कोटी रुपये.
 साधुग्राम, वाहनतळ, भाविक मार्गावरील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. २५ कोटी रुपये.
 गंगापूर व मुकणे पाणी पुरवठा योजनेवरील पंपिंग स्टेशन बळकटीकरण: २० कोटी रुपये.
 साधुग्राममध्ये जलकुंभ उभारणे : ५ कोटी रुपये

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com