Nashik : सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिकमध्ये 16 पर्यटनस्थळे उभारणार

Kumbh Mela
Kumbh MelaTendernama

नाशिक (Nashik) : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या विविध विभागांनी प्रारुप आराखड्यासाठी कामे सूचवली आहेत. त्यात प्रामुख्याने रस्ते, पूल, पाणी पुरवठा योजना, मलनिस्सारण केंद्रांचे सक्षमीकरणे व आधुनिकीकरण यांचा समावेश असून हा आराखडा जवळपास आठ ते दहा हजार कोटी रुपयांचा होणार आहे. या आराखड्यात महापालिकेने शहरात १६ पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी कामे प्रस्तावित केली आहेत. या पर्यटनस्थळांच्या विकासासाठी ६५ कोटी रुपये लागणार असून या कामांमध्ये थीम पार्क, फेरी व रोप-वे यांचा समावेश आहे.

Kumbh Mela
मृत्यू तांडवानंतर सरकारला जाग: नव्या वर्षापासून औषध खरेदी दर करारानुसार; टेंडर प्रक्रिया बंद

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७-२०२८ या वर्षात सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. आता चार वर्षांपेक्षा कमी कालावधी उरला असल्यामुळे जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडून सिंहस्थ पूर्वतयारी सुरू झाली आहे. महापालिका प्रशासन प्रारुप आराखडा तयार करीत असून या आराखड्यातील कामे मार्गी लावण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून निधीची मागणी केली जाणार आहे. निधीसाठी सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने महापालिकेच्या ४३ विभागांनी सिंहस्थासाठी करावी लागणारी कामे प्रस्तावित केली असून या कामांचा एकत्रित प्रारुप आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे.

Kumbh Mela
EXCLUSIVE : मुख्य सचिवांच्याच नियमांना 'वाकुल्या'; तब्बल पावणेतीन वर्षे PWDत अनधिकृत कारभार!

या कामांमध्ये प्रामुख्याने नाशिक शहराती रस्ते, मलनिस्सारण व्यवस्था, नवीन पाणी पुरवठा योजना, जुन्या पाणी पुरवठा योजनांचे सक्षमीकरण आदी कामांचा समावेश असला, तरी महापालिकेने पर्यटनसंबंधी कामेही यात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहरातील सोळा पर्यटनस्थळांचा विकास केला जाणार आहे. यामुळे नाशिकला येत असलेल्या भाविकांसाठी चांगल्या सुविधा मिळतील. नाशिककरांनाही सुटीच्या दिवशी शहरातल्या शहरात मनोरंजनाची साधने उपलब्ध होण्याबरोबरच रोजगारालाही चालना मिळू शकणार आहे. या १६ पर्यटनस्थळांच्या विकासासाठी जवळपास ६५ कोटींचा खर्च येणार असून प्रारुप आराखडा अंतिम करण्याचे काम सुरू आहे. या आराखड्यात साधारणपणे थीम पार्क प्रस्तावित आहे. एक थीम घेऊन त्यावर आधारित उद्यानाची निर्मिती तसेच गोदावरी नदीपात्रामध्ये जेटी व बोटिंग चालवणे याबरोबरच रोप-वेची संकल्पना आहे.

Kumbh Mela
Nashik : स्मार्टसिटी सीसीटीव्ही टेंडर घोटाळा; मृत सीएच्या स्वाक्षरीचे जोडले कागदपत्र

या ठिकाणी होणार कामे (कंसात रक्कम कोटी रुपये)
 सोमेश्वर धबधबा (२.९७)
 सोमेश्वर महादेव मंदिर (९६)
 नवशा गणपती मंदिर विकास (१.५२)
 बापू पार्क (११.०९)
 गोदापार्क (उजवी बाजू) (१९.१२)
 कुसुमाग्रज उद्यान (७५)
 पंचवटी (५.००)
 नवी भाजी बाजार (२.३५)
 कपिला संगम (५.८७)
 वाघाडी नाग चौक वॉटर फॉल (२.९२)
नंदिनी-गोदावरी संगम (३.९२)
 समर्थ रामदास स्वामी मठ विकास (१.७०)
 दशरथ घाट, नांदूर (४.४१)
 फेरी- (४.००)
 रोप-वे (७.००)
 थीम पार्क (३.००)

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com