पिंपरी-चिंचवडला पुण्याशी जोडणाऱ्या 'त्या' सेवेचे 48 व्या वर्षात पदार्पण

Pune Lonavala Local Train : पुणे ते लोणावळा उपनगरीय (लोकल) सेवा ११ मार्च १९७८ रोजी सुरू झाली
Pune City
Pune CityTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : पुणे-लोणावळा उपनगरीय रेल्वे (लोकल) (Pune Lonavala Local) सेवेला मंगळवारी (ता. ११) ४७ वर्षे पूर्ण झाली. दरम्यानच्या काळात लोकल सेवेने विविध टप्यांतून मार्गक्रमण केले असून, आजपर्यंत लाखो जणांचा प्रवास सुखकर झाला आहे. शिवाय, लोणावळा आणि पुणे हाकेच्या अंतरावर आले आहे.

Pune City
शिवशाही बसचा प्रवास... नको रे बाबा! काय आहे कारण?

पुणे ते लोणावळा उपनगरीय (लोकल) सेवा ११ मार्च १९७८ रोजी सुरू झाली. एक रेक (गाडी) आणि दोन फेऱ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज चार रेक आणि ४० फेऱ्यांपर्यंत आला आहे. या सेवेमुळे पिंपरी चिंचवड शहराची उपनगरे आणि ग्रामीण भागासह पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांशी मावळचा भाग जोडला गेला आहे.

या मार्गावरील हजारो प्रवासी, पर्यटक, चाकरमानी, शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी दररोज ये-जा करत आहेत. यासह ग्रामीण भागातून शहरात दूध आणि भाजीपाला विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात. त्यामुळे ही सेवा हजारो जणांची ‘लाइफलाइन’ झाली आहे.

Pune City
'या' पुलामुळे पुणे ते शिरूर अंतर अवघ्या 80 मिनिटांत पार करता येणार

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात जलद प्रवास करता येत असल्याने चाकरमानी, विद्यार्थी आणि शेतकरी आजही लोकलने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. सुरुवातीला पुणे विभागाला नऊ डब्यांचे डायरेक्ट करंटवर (डीसी) धावणारे ‘जेसप’ कंपनीचे रेक मिळाले होते. २००८-०९ च्या सुमारास बारा डब्यांची लोकल धावू लागली.

‘डीसी करंट’वर धावणारी लोकल २०१२ च्या सुमारास अल्टरनेट करंटवर (एसी) धावू लागली. त्यामुळे वेग वाढला. लोकलच्या फेऱ्याही ३८ वरुन ४४ झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. १९७८ नंतर कधीही न थांबणारी लोकलची चाके २०२० मध्ये कोरोनामुळे थांबली. सुमारे दोन वर्षांनी लोकल सेवा सुरू झाली; मात्र फेऱ्या कमी होऊन ४४ वरुन ४० झाल्या.

Pune City
सोलापुरकरांना फडणवीस सरकारने काय दिले मोठे गिफ्ट? तब्बल 1191 कोटींच्या...

शिवाजीनगरला लोकलसाठी विशेष प्लॅटफार्म तयार करुन येथून तळेगाव आणि लोणावळासाठी चौदा लोकल फेऱ्या सुरू झाल्या. नोव्हेंबर २०२३ मध्ये स्वयंचलित सिग्नल यंत्रणेचे काम पूर्ण झाले. त्यामुळे रेल्वे गाड्या अचूक वेळेत धावून प्रवासाच्या वेळेत बचत झाली. या सेवेने आता ४८ व्या वर्षात पदार्पण केले आहे.

मी कॉलेजात असल्यापासून लोकलने प्रवास करतो आहे. गेल्या २३ वर्षांत प्रवाशांची संख्या वाढली मात्र फे-या तेवढ्याच आहे. मुंबईला वापरुन झालेले रेक दरवेळी पुण्याला दिले जातात. पुण्याला नवीन रेक दिले पाहिजेत. सोयी-सुविधांमध्येही वाढ केली पाहिजे.

- मयुरेश जव्हेरी, प्रवासी

Pune City
Pimpri : पिंपरी-चिंचवडकरांना निगडीनंतर आता चाकणपर्यंत मिळणार दुसरा मार्ग

पुणे-लोणावळा मार्ग माहिती दृष्टीक्षेपात

- लोकल फेऱ्या - ४०

- प्रवासी - दररोज सरासरी ७० हजार

- एकूण स्थानके - १७

- एकूण अंतर - ६०.५९ कि.मी.

प्रवाशांच्या मागण्या

- तिसरी आणि चौथी मार्गिका लवकर व्हावी

- गर्दीच्या वेळेत फास्ट लोकल सुरू व्हाव्यात

- ‘मेधा’ किंवा बम्बार्डियार (अलस्ट्रॉम) रेक द्या

- लोकल फेऱ्या वाढवाव्यात

- दुपारची लोकल सेवा पुन्हा सुरू करावी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com