सोलापुरकरांना फडणवीस सरकारने काय दिले मोठे गिफ्ट? तब्बल 1191 कोटींच्या...

Devendra Fadnavis
Devendra FadnavisTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : सोलापूर शहरातील (Solapur City) पाणी पुरवठा सुधारण्यासाठी अमृत 2.0 (Amrut 2.0) योजनेअंतर्गत आवश्यक कामासाठी ८९२ कोटींचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात आला आहे. तसेच शहरात उभारण्यात येत असलेल्या दोन उड्डाणपुलांच्या (Flyover) भूसंपादनासाठी २९९ कोटींच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली. (Devendra Fadnavis News Update)

Devendra Fadnavis
Uday Samant : विधानसभेत सरकारची मोठी घोषणा; पुढच्या अधिवेशनापूर्वी...

सोलापूर शहरात राबविण्यात येत असलेल्या पायाभूत सुविधा व विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणी संदर्भात लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन महानगरपालिका व संबंधित  अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सामंत यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. सोलापूर शहरात सांडपाणी वाहिन्या काही ठिकाणी सीव्हेज टँकशी जोडणी पूर्ण झालेली नसल्याने ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Devendra Fadnavis
शिवशाही बसचा प्रवास... नको रे बाबा! काय आहे कारण?

सोलापूर शहराला दर दिवशी 215 एमएलडी पाणीपुरवठा होत असून शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी अमृत 2.0 योजनेअंतर्गत आवश्यक कामासाठी 892.42 कोटी सविस्तर प्रकल्प अहवालातील त्रुटींची पूर्तता करून अहवाल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणास तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.

सोलापूर शहरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत असलेल्या दोन उड्डाणपूलांच्या भूसंपादनसाठी २९९ कोटी इतक्या रकमेच्या प्रस्तावास महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. 

Devendra Fadnavis
'या' पुलामुळे पुणे ते शिरूर अंतर अवघ्या 80 मिनिटांत पार करता येणार

यामधील सेक्शन एकमधील खासगी मिळकतींची भूसंपादन प्रक्रिया सुरू असून या सेक्शन मधील नऊ निवाड्यापैकी पाच निवाडे घोषित करण्यात आले आहेत उर्वरित चार निवाडे अंतिम करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तर सेक्शन दोन मधील ८४ खासगी मिळकतीच्या भूसंपादन करिता अधिसूचना निर्गमित करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. यासंदर्भात सदस्य देवेंद्र कोठे यांनी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com