Pune : पुलाच्या बांधकामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरातीमागून घोडे

PWD
PWDTendernama
Published on

पुणे (Pune) : पौड-कोळवण-काशिग रस्त्यावर चाले येथे जुना पुल पाडून त्याजागी नव्या पुलाचे काम सुरू आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाच्या माहिती संदर्भातील एकही फलक लावलेला नाही. केवळ ऑक्टोबर २०२४ मध्ये तत्कालीन आमदारांनी भूमिपूजन केल्याची माहिती असलेली कोनशिला लावली आहे. पुलाचे काम संथ गतीने सुरू असून हे काम टेंडरप्रमाणे वर्षाच्या आत म्हणजे ४ मार्च २०२५ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते, परंतु तसे झालेले नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरातीमागून घोडे निघाल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.

PWD
Pune : हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDA ने काय घेतला निर्णय?

चाले येथील पुलाचे बांधकाम करण्यासाठी राज्य शासनाकडून ५ मार्च २०२४ रोजी टेंडर निघाले होती, हे काम निखिल कन्स्ट्रक्शन कंपनी करत आहे. टेंडरमधील मुदतीनुसार या पुलाचे बांधकाम एक वर्षाच्या मुदतीत पूर्ण करावे असे यात नमूद होते. प्रत्यक्षात या पुलाचे बांधकाम उशीरा सुरु झाले. हे काम करण्यासाठी शासनाने सुमारे ४ कोटी ८६ लाख इतका निधी मंजूर केला आहे. अजूनही पुलाच्या ७ कॉलमचेच काम सुरू आहे. त्यावर स्लॅब होणे बाकी असून त्यानंतर दोन्ही बाजूचे संरक्षक कठडे व पौड-कोळवणला जोडणारा रस्ता व त्याचे डांबरीकरण करणे अशी कामे बाकी आहेत. आता ही कामे पावसाळ्यापूर्वी होणार का? असा सवाल नागरिक करत आहेत.

PWD
Pune : राज्य सरकारने आदेश न काढल्याने पुण्यातील 'या' प्रमुख कामाची टेंडर प्रक्रिया ठप्प

मात्र या पुलाच्या कामाबाबत माहिती असलेला एकही फलक तेथे लावलेला नाही. स्वराज्य पक्षाचे तालुकाप्रमुख राजू फाले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता एम. एस. भिंगारदेवे यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यानंतर येथे काम करणाऱ्या निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीकडून या पुलाचे कोळवणकडून येणाऱ्या बाह्यवळण मार्गावर पुलाच्या बांधकामाबाबत माहिती देणारा फलक मागील आठवड्यात लावला. ते सुद्धा कामाची मुदत संपून एक महिना झाल्यावर व या कामाचे टेंडर निघाल्यानंतर १३ महिन्यांनी. दरम्यान पुलाचे बांधकाम पावसाळ्यापूर्वी व गुणवत्तेचे व्हावे म्हणून कोळवण खोऱ्यातील सर्व गावचे सरपंच, प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधिकारी व ग्रामस्थ लवकरच सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे यांची भेट घेत त्यांना निवेदन देणार आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com