Hinjawadi IT Park Traffic
Hinjawadi IT Park TrafficTendernama

Pune : हिंजवडीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी PMRDA ने काय घेतला निर्णय?

Published on

पिंपरी (Pimpri) : हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए PMRDA) सकारात्‍मक आहे. त्‍यासाठी आवश्‍यक कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन ‘पीएमआरडीए’चे आयुक्‍त योगेश म्‍हसे यांनी हिंजवडी इंडस्‍ट्रियल असोसिएशनच्‍या प्रतिनिधींना दिले.

Hinjawadi IT Park Traffic
सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचा ‘तो’ प्रस्ताव फेटाळावा; मुख्यमंत्र्यांना पत्र

मेट्रोलाइन तीनबाबत अंतिम काम, नवीन रस्ते आणि पायाभूत सुविधा, विकास प्रस्तावाबाबत नुकतीच म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. हिंजवडी औद्योगिक क्षेत्राच्या विकासावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात आली होती.

यावेळी असोसिएशनच्या सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित करून रस्त्याबरोबरच पायाभूत सुविधा पुरवण्याची मागणी केली. आयटी कंपन्यांच्या प्रतिनिधींनीदेखील वाहतूक कोंडीबाबत प्रश्न उपस्थित केला.

Hinjawadi IT Park Traffic
Narendra Modi : 2014 नंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये; काय आहे कारण?

या बैठकीत पीएमआरडीएचे मुख्य अभियंता रिनाज पठाण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, हिंजवडी इंडस्ट्रियल असोसिएशन आणि आयटी कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी आयटी कर्मचाऱ्यांच्या समस्या, वाहतूक, सार्वजनिक वाहतूक सेवा, वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील असलेले विविध अतिक्रमण आणि पार्किंग बाबत चर्चा करण्यात आली.

Hinjawadi IT Park Traffic
सांगलीत एकाच रस्त्यावर 2 वेगवेगळ्या योजनांतून तब्बल 10 कोटी हडपले

यावर हिंजवडी क्षेत्रातील प्रश्‍नांवर सकारात्मक पावले उचलण्यात येत आहेत. काही दिवसांमध्ये वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच अतिक्रमणांवर कारवाई होणार आहे. हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. मेट्रोचे हिंजवडी साइटचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित पूर्ण करण्यात येणार आहे.

नवीन रस्ते प्रकल्प आणि औद्योगिक क्षेत्राची जोडणी करण्यात येणार आहे. मान्सूनपूर्व तयारीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत,’’ अशी माहिती आयुक्त म्हसे यांनी दिल्या.

Tendernama
www.tendernama.com