Pune : महापालिकेचे तब्बल 147 कोटींचे 'ते' वादग्रस्त टेंडर नवे आयुक्त रद्द करणार?

Pune, PMC
Pune, PMCTendernama
Published on

पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्ते झाडण्यासाठी काढण्यात आलेल्या टेंडरमध्ये संगनमत झाल्याचे समोर आले आहे. (Tender Ring In PMC Tender News)

Pune, PMC
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या 'त्या' अटी-शर्थी बदलण्यास...

ठराविक ठेकेदारांसाठी टेंडरच्या अटी - शर्ती निश्‍चित करण्यात आल्या. त्यामुळे या वादात सापडलेल्या टेंडरची अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी चौकशी करून त्याचा अहवाल महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना सादर केला आहे. तब्बल १४७ कोटी रुपयांच्या टेंडरमध्ये संगनमत (रिंग) घडवून आणताना अधिकाऱ्यांच्याही अनेक सुरस कथांची महापालिकेत चर्चा रंगली आहे.

शहरातील १४ क्षेत्रीय कार्यालयांमधील रस्ते, गल्लीबोळ झाडून काढण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविताना त्यात ठरावीक ठेकेदारांसाठी जुन्या अटी शर्तींवर झाडू फिरवून नव्या नियम - अटी निश्‍चित केल्या. टेंडर प्रकाशित होण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार असणे, चॅम्पियन मशिन खरेदी केलेली असणे आवश्‍यक आहे. अशा अटी टाकून मोजके ठेकेदार पात्र होतील व अनेकजण टेंडरच भरू शकणार नाहीत, अशी व्यवस्था महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी संगनमताने केली होती.

Pune, PMC
गुड न्यूज! पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास होणार आणखी वेगवान

महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय स्तरावरचे कनिष्ठ अभियंता, कर्मचारी, सहाय्यक आयुक्त हे या टेंडरची अंमलबजावणी करणार असतानाही त्यांना या नवीन अटी - शर्तींबद्दल माहिती नसल्याचेही समोर आले होते. या प्रकरणात अनेक गडबडी होत असल्याने याची चौकशी करण्याच्या सूचना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिल्या होत्या.

त्यामुळे टेंडर प्रक्रिया ३१ मे पूर्वी स्थायी समितीमध्ये मंजूर करून हा वादग्रस्त विषय शांत करण्याचा प्रयत्न सुरू असताना हे मनसुबे उधळले गेले. पृथ्वीराज बी. पी. यांनी ही टेंडर प्रक्रिया स्थगित करून आयुक्तांकडे चौकशी अहवाल सादर केला जाईल असे सांगितले होते. तसेच प्रथमदर्शनी या टेंडरमध्ये संगनमत झाल्याचे त्यांनीही स्पष्ट केले होते.

Pune, PMC
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा; एसटी कर्मचाऱ्यांना...

पृथ्वीराज बी. पी. यांनी हा गोपनीय अहवाल नवनियुक्त आयुक्त राम यांच्याकडे सादर केला आहे. त्यावर आयुक्तांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. दरम्यान, या अहवालात टेंडरमध्ये संगनमत झाल्याने ही प्रक्रिया रद्द करावी, अशी शिफारस केल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

नवल किशोर राम म्हणाले, ‘‘झाडणकामाच्या टेंडरचा चौकशी अहवाल प्राप्त झाला असून, तो बघून निर्णय घेतला जाईल.’’

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com