Pune: PWD थांबविणार का हा जीवघेणा प्रवास? टेंडर कधी निघणार?

Sinhgad Fort Road
Sinhgad Fort RoadTendernama

पुणे (Pune) : सातत्याने कोसळणाऱ्या दरडींमुळे मागील काही वर्षांपासून सिंहगडाचा (Sinhgad Fort) घाट रस्ता जीवघेणा बनला आहे.‌ सध्याही घाट रस्त्यावर जागोजागी लहान-मोठी दरड कोसळून दगड-मातीचे ढीग दिसत आहेत. या रस्त्यावरून दररोज हजारो पर्यटकांसह स्थानिक रहिवासी व विक्रेत्यांची ये-जा असते. मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने कधी पाहणार असा प्रश्‍न आहे.

Sinhgad Fort Road
Amravati : 'या' तालुक्यात होणार 181 कोटींची विकासकामे

शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी सिंहगडाच्या घाट रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. कोंढणपूर फाट्यापासून गाडीतळापर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यातच पाऊस सुरू झाल्यानंतर पर्यटक डोंगरकपारीच्या आडोशाला उभे राहतात. अधांतरी अडकलेले मोठे दगड किंवा डोंगराचा भाग कोसळल्यास भीषण परिस्थिती उद्भवू शकते.

अशावेळी मदत व बचाव कार्य करण्यातही मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने अगोदरच या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कार्यवाही करणे आवश्यक आहे.

Sinhgad Fort Road
Pune: वाघोली ते पिंपरी-चिंचवड अंतर कमी होणार! असा आहे मेगा प्लॅन..

अशी आहे स्थिती

- पाऊस सुरू झाल्यानंतर मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दररोज सरासरी पाच ते दहा हजारांपर्यंत पोचली आहे.

- शनिवार व रविवारी हा आकडा दुप्पट झालेला दिसून येतो.

- यातील बहुतांश पर्यटक हे दुचाकी किंवा चारचाकी वाहनाने घाट रस्त्यावरून गडावर जातात.

- घाट रस्त्यावर गोळेवाडी येथील तपासणी नाक्यापासून सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंतरावर अत्यंत धोकादायक दरड आहे.

- वर्षभर येथे मोठमोठे दगड कोसळून रस्त्यावर येत असतात.

- या ठिकाणी अत्यंत तीव्र वळण व उतार असल्याने दरड कोसळत असताना वाहन तेथे असल्यास अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.

- घाट रस्त्यावर इतरही आठ ते दहा ठिकाणी अशीच परिस्थिती असल्याने प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

पंधरा दिवसांतील वाहनांची संख्या व उपद्रव शुल्क

१) दुचाकी -१३,६८४

२) चारचाकी - ५३४०

३) एकूण उपद्रव शुल्क - १२,२१,२००

Sinhgad Fort Road
Good News: नितीन गडकरी संपविणार पुणेकरांची डोकेदुखी? तारीखही ठरली!

सार्वजनिक बांधकाम विभागाला दरड प्रतिबंधक काम करण्यासाठी तत्काळ टेंडर प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून लवकरात लवकर काम सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका आहे तेथे पर्यटकांना सूचना देण्यासाठी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार आहेत. तसेच फलकही लावण्यात आलेले आहेत.

- प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com