Amravati : 'या' तालुक्यात होणार 181 कोटींची विकासकामे

Amravati
AmravatiTendernama

अमरावती (Amravati) : नांदगाव खंडेश्वर तालुक्याकरिता आमदार प्रताप अडसड यांनी विकासनिधी खेचून आणला. या 181 कोटींच्या निधीतून विविध विकासकामे तालुक्यात होणार आहेत. सलग तीन दिवस या कामांचे भूमिपूजन 51 गावांमध्ये पार पडले.

Amravati
Mumbai Metro-12 : 'MMRDA'ने काढले 'या' कामांसाठी टेंडर

तालुक्‍यातील सावनेर, आडगाव बु., माजरी म्हसळा, सातारगाव, कंझरा, फुबगाव, धामक, येवती, जनुना, पुसनेर, नडसावंगी, खंडाळा, पळसमंडल, ढवळसरी, वेणी गणेशपूर, मंगरूळ चावला, सालोड, खानापूर, गोळेगाव, शिवरा, पिंपळगाव, पिंपळगाव, वाढोणा, पापळ, सुकळी गुरव, कोव्हळा व जटेश्वर, राजना, काजना, पाळा, दाभा, चांदसुरा, भगुरा, सार्सी, धानोरा फशी, नांदुरा, ढवळसरी, मोरगाव, टाकळी बु, फुलआमला, दहिगाव, हिवरा बु, बोपी, वाटपूर, हिंगलासपूर, शेलूगुंड, वडूरा, सिद्धनाथपूर, चाकोरा, साखरा आदी गावांमध्ये सभागृह, सिमेंट रस्ता, डांबरी रस्ता, सौंदर्यीकरण, 'ब' दर्जा मंदिर विकासकामे होत आहेत.

Amravati
Nagpur: एक हजार 927 कोटींच्या 'या' प्रकल्पासाठी लवकरच निघणार टेंडर

या विकासकामा अंतर्गत गावोगावी रस्ते, पांदण रस्ते, बोअरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा, मैदानी खेळाडूंना पाण्याची सोय करण्यात येणार आहे.  आमदार प्रताप अडसड यांनी खेचून आणलेल्या विकास निधीतून तालुक्यातील विविध ठिकाणी सुविधा उपलब्ध होत असल्याने  नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. गावातील लोकांना अनेक सोयीसुविधा उपलब्ध होणार असून लोकांनी आमदार प्रताप अडसड यांचे आभार मानले. या भूमिपूजनाला आमदार प्रताप अडसड, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुदे, भाजप तालुकाध्यक्ष दीपक तिखिले, भाजयुमो तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे सोबत गावकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com