Good News: नितीन गडकरी संपविणार पुणेकरांची डोकेदुखी? तारीखही ठरली!

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

पुणे (Pune) : चांदणी चौक येथे उड्डाणपुलाचे (Chandani Chowk Flyover) ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, या पुलाचे उद्‍घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते १२ ऑगस्टला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, उद्‍घाटनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहतील, असे ‘एनएचएआय’चे सल्लागार अभियंता भारत तोडकरी यांनी सांगितले.

Nitin Gadkari
मुंबई मेट्रो स्थानकात गळतीमुळे बादल्या ठेवण्याची वेळ; बांधकामाच...

उड्डाणपुलासाठीच्या कॉलमचे, तसेच दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील एकूण ३२ गर्डरपैकी २५ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. तर मुख्य रस्त्यावरचे नऊ पैकी पाच गर्डरचे काम पूर्ण झाले असून सेवा रस्त्याच्या चार स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मंगळवारी त्या ठिकाणी भेट देऊन कामाचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) प्रकल्प संचालक संजय कदम, प्रकल्प व्यवस्थापक श्रीनिवास, प्रकल्प समन्वयक किशोर भरेकर, एनएचएआय सल्लागार अभियंता भारत तोडकरी, सुरक्षा अधिकारी कुंदन कुणाल आदी उपस्थित होते.

Nitin Gadkari
Nagpur: एक हजार 927 कोटींच्या 'या' प्रकल्पासाठी लवकरच निघणार टेंडर

या चौकात पाच वेगवेगळे मार्ग जातात. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा हा चौक आहे. या चौकातील वाहतुकीची कोंडी फोडण्याबरोबरच सुशोभीकरणाचे काम ‘एनएचआय’कडून हाती घेण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात या प्रकल्पाचे बरेचसे काम पूर्ण झाले आहे.

सध्या पुलाचे गर्डर टाकण्याचे काम सुरू आहे. पुढील महिन्यात उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याचे नियोजन असून त्यादृष्टीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे भेटीनंतर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Nitin Gadkari
Nashik : रिंगरोडसाठी महापालिकेकडून अडीचपट टीडीआरचा प्रस्ताव?

इतर कामे प्रगतिपथावर...

व्हीओपी कामांतर्गत स्तंभाच्या तुळईचे (बीम ऑफ कॉलम) काम पूर्ण झाले आहे. दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यावरील एकूण ३२ गर्डरपैकी (गर्डर लांबी २२ ते ३५ मी) २५ गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य रस्त्यावरचे नऊ पैकी पाच गर्डरचे (गर्डरची लांबी ५७.५ मी) काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. सेवा रस्त्याच्या चार स्पॅनचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. मुख्य रस्त्यावरील स्लॅब बांधणीचे काम सुरू असून इतर कामे प्रगतिपथावर आहेत, असेही जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.

या प्रकल्पाचे एकूण ९५ टक्के काम पूर्ण झाले, असे ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक कदम यांनी सांगितले. तर, नव्या उड्डाणपुलाचे सर्व गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले असून प्लास्टर करण्याचे काम बाकी आहे. हे काम महिनाअखेरीस पूर्ण होईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com