Pune : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार; लवकरच सुरू होणार 'हा' डीपी रोड

Sinhagad Road Flyover
Sinhagad Road FlyoverTendernama
Published on

पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी (Sinhagad Road Traffic) कमी करण्यासाठी सनसिटी रस्ता ते इंडियन ह्यूम पाइप कंपनी नवीन डीपी रस्त्याचे काम खूप दिवसांपासून सुरू होते, परंतु सिंहगड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विद्युत रोहित्राचा अडथळा होत असल्याने हे काम रखडले होते. ते विद्युत रोहित्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले असून हा रस्ता लवकरच पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

Sinhagad Road Flyover
Nitin Gadkari : नितीन गडकरींनी सोलापूरकरांना केले खूश! काय घेतला निर्णय?

रस्त्याच्या मधोमध असलेले हे महावितरण कंपनीचे विद्युत रोहित्र या सेवा रस्त्याच्या कामात अडथळा ठरत होते. त्यामळे हा रस्ता सिंहगड रस्त्याला जोडणे शक्य होत नसल्याने हे रोहित्र येथून तत्काळ हलविण्याची मागणी नागरिकांनी केली होती.

Sinhagad Road Flyover
PWD Scam : उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा शासकीय तिजोरीवरच दरोडा! काय आहे प्रकरण?

महापालिकेच्या विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन हे रोहित्र दुसऱ्या ठिकाणी हलविण्यासाठी तिथे काम सुरू केले होते. विद्युत रोहित्र दुसऱ्या ठिकाणी हलविल्यानंतर त्या ठिकाणी अर्धवट राहिलेले काम पथ विभागाने पूर्ण केल्यानंतर तिथून काही प्रमाणात वाहतूक होत आहे.

Sinhagad Road Flyover
PWD Scam : पुण्यातील 'त्या' रुग्णालयाच्या टेंडर प्रक्रियेत गंभीर अनियमितता

पथ विभागाचे उपअभियंता नरेश रायकर यांनी सांगितले की, डीपी रस्त्याचे काम किरकोळ स्वरूपात राहिलेले असून, हा रस्ता महिनाअखेर नागरिकांना वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरू करण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com