Pune Railway Station : पुणे रेल्वे स्थानकाच्या दोन्ही यार्डातील 200 डब्यांवर अशी राहणार 'नजर'

Indian Railways
Indian RailwaysTendernama

पुणे (Pune) : पुणे रेल्वे स्थानकाच्या (Pune Railway Station) दोन्ही बाजूच्या यार्डमध्ये चांगल्या दर्जाचे सुमारे ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यात सोलापूरच्या दिशेने असलेल्या जीसीएमसी (घोरपडी कोच मेन्टेनन्स कॉम्प्लेक्स) जवळ २५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये २५ कॅमेरे बसविणार आहे. दोन्ही यार्ड मिळून सुमारे २०० डबे वेगवेगळ्या लाइनवर उभे असतात, त्याच्यांवर ‘नजर’ ठेवणे सोपे होणार आहे.

Indian Railways
Nashik : नाशकातील वृक्षगणनेसाठी यंदा दुप्पट खर्च; 5 कोटींची...

पुणे स्थानकाच्या जुने वॉशिंग सायडिंगवर उभ्या असलेल्या एका प्रवासी डब्याला आग लागली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने दोन्ही यार्डमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. सद्यःस्थितीत यार्डमध्ये काही प्रमाणात कॅमेरे होते. मात्र, ते कॅमेरे सुमार दर्जाचे आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने चांगल्या दर्जाचे सुमारे ५० कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. मार्चअखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल.

Indian Railways
MGNREGA : राज्यात वैयक्तिक लाभाच्या योजनांचे 671 कोटी चार महिन्यांपासून थकले

२०० डब्यांवर राहणार नजर

पुणे स्थानकावरून दररोज सुमारे १६० रेल्वे तर विभागातून सुमारे २०० रेल्वे धावतात. ऐनवेळी डब्यात कोणती अडचण निर्माण झाली तर पुणे स्थानकाच्या यार्डमध्ये राखीव स्वरूपात ठेवलेल्या डब्याचा वापर केला जातो. तसेच देखभाल दुरुस्तीचे डबे, आयुर्मान संपलेले डबे देखील काही प्रमाणात येथेच ठेवले जातात. त्यामुळे सायडिंग लाइन, स्टॅब्लिन्ग लाइन, पिट लाइनवर मोठ्या प्रमाणात डबे असतात. सीसीटीव्हींमुळे या भागांवर नजर ठेवणे सोपे होणार आहे. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण होण्यास मदत होईल.

Indian Railways
Chandrakant Patil : मंत्री चंद्रकांत पाटलांच्या पत्राला कोणी दाखवली केराची टोपली?

पुणे स्थानकाच्या दोन्ही यार्डमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरच्या दिशेने असलेल्या जीसीएमसीजवळ पहिल्या टप्प्यात कॅमेरे बसविले जातील. त्यानंतर मुंबईच्या दिशेने असलेल्या यार्डमध्ये कॅमेरे बसविले जाणार आहे.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com