Pune Nashik Highspeed Railway : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेचे एक पाऊल पुढे; सरकार देणार 196 कोटी

Pune
Pune Tendernama

पुणे (Pune) : पुणे-नाशिक या दोन शहरांना जवळ आणणाऱ्या सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी (Pune Nashik Semi Highspeed Railway Project) महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीस १९६ कोटी रुपयांचा निधी देण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे पडले असल्याचे मानले जात आहे.

Pune
Nashik : बनावट कागदपत्रे प्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करा; विधानसभा उपाध्यक्षांच्या ZP सीईओंना सूचना

सद्यस्थिती...

- पुणे-नाशिक या नवीन सेमी हायस्पीड डबल लाइन रेल्वे मार्गाच्या बांधकाम करण्यासाठी आर्थिक सहभाग घेण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आठ मार्च २०२१ मध्ये घेतला

- या प्रकल्पासाठी एकूण १६ हजार ३९ कोटी खर्चाच्या अंदाजपत्रकास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली

- या रेल्वे प्रकल्पाच्या भूसंपादनासाठी महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी रेल्वे प्रकल्पास निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली

- त्यानुसार राज्य सरकारकडून हा निधी देण्यात आला

- याबाबतचा सरकारी आदेश गृह विभागाचे कार्यासन अधिकारी प्रताप माडकर यांनी काढले

- महाराष्ट्र लोहमार्ग पायाभूत विकास कंपनीकडून भूसंपादनासाठी हा निधी मागणीच्या प्रमाणात पुणे जिल्हाधिकारी, अहमदनगर व नाशिक यांना वितरित करण्यात येणार

Pune
Nashik : सिंहस्थामध्ये होणार 17 हजार कोटींची कामे; मंत्री महाजनांना आराखडा सादर

प्रकल्प का हवा?

- पुणे आणि नाशिक ही दोन शहरे औद्योगिक, कृषी विकासात आघाडीवर

- या दोन स्मार्ट सिटीला जोडण्यासाठी ‘पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प’ उपयुक्त ठरणार

- या प्रकल्पामुळे पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तिन्ही जिल्ह्यातील पर्यटन, शिक्षण, शेती, व्यवसाय, उद्योग क्षेत्रांच्या विकासाला गती मिळणार

- या रेल्वेमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार

- या प्रकल्पामुळे पुणे-नाशिक प्रवासाच्या वेळेत मोठी बचत होणार

- अवघ्या दोन तासांत हे अंतर कापले जाणार

Pune
Nashik : भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी महासभेने घेतला वेगळा निर्णय

असा आहे प्रकल्प...

- पुणे नाशिक रेल्वे मार्ग सुमारे २३५ किलोमीटर लांबीचा

- रेल्वे मार्ग पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून जाणार

- रेल्वेचा २०० किलोमीटर प्रति तास वेग

- पुणे-नाशिक अंतर अवघ्या दोन तास

- पुणे-नाशिक दरम्यान सुमारे २४ स्थानकांची आखणी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com