Nashik : बनावट कागदपत्रे प्रकरणी ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करा; विधानसभा उपाध्यक्षांच्या ZP सीईओंना सूचना

Nashik ZP
Nashik ZPTendernama

नाशिक (Nashik) : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून केंद्रीय मंत्र्यांच्या स्वीयसहायकाशी संबंधित ठेकेदाराने टेंडरसोबत जोडलेल्या बनावट कागदपत्रांची तपासणी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली असून, या कागदपत्रांची वैधता तपासण्याचे काम सुरू आहे.

या तपासणीनंतर त्यात सत्यता आढळल्यास संबंधिताविरोधात फौजदार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्याकडून देण्यात आली.

दरम्यान ऐन निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने भाजप मंत्र्यांशी संबंधित कामावरून ठेकेदाराविरोधात कारवाई करण्यासाठी दिलेले पत्र चर्चेचा विषय झाला आहे.

Nashik ZP
Nashik : जिल्हा परिषदेला प्रतीक्षा निवडणूक जाहीर होण्याची; 135 कोटी खर्चाचे आव्हान

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग तीनमध्ये काही महिन्यांपूर्वी चांदवड तालुक्यातील कामांचे टेंडर उघडणे, काम प्रलंबित नसल्याच्या दाखल्यावरून दोन ठेकेदारांमध्ये वाद झाला होता. त्यावेळी केंद्रीय मंत्र्यांच्या स्वीयसहायकाशी संबंधित ठेकेदाराच्या हस्तक्षेपाविरोधात अखेरीस भाजपचे आमदार डॉ. राहुल आहेर यांना हस्तक्षेप करावा लागल्याने त्यातून मार्ग काढत जिल्हा परिषद प्रशासनाने कामाच्या स्वरुपात बदल करीत फेरटेंडर राबवण्याचा निर्णय घेतल्याने वाद शमला होता.

त्यानंतर बांधकाम विभाग एकमध्ये दिंडोरी तालुक्यातील ७० लाखांच्या रस्त्याचे टेंडरही दोन महिन्यांपासून वादात सापडले आहे. या प्रकरणातही भाजप तालुकाध्यक्षाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांकडून एका ठेकेदाराने काम मिळवल्यानंतर मंत्र्यांच्या स्वीयसहायकाच्या जवळच्या ठेकेदाराने त्या कामाचे टेंडर भरल्याने हे टेंडर वादात सापडले होते.

Nashik ZP
Nashik : सिंहस्थामध्ये होणार 17 हजार कोटींची कामे; मंत्री महाजनांना आराखडा सादर

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रकाश वडजे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून प्रतिक देशमुख या ठेकेदाराने टेंडरसोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याच मागणी केली होती. त्या पत्रातील मागणीप्रमाणे बांधकाम विभागाकडून चौकशी सुरू असतानाच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून या ठेकेदाराने टेंडरसोबत जोडलेल्या कागदपत्रांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

त्यांच्या पत्रानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता डॉ. अर्जुन गुंडे यांनी कागदपत्रांची तपासणी करून बनावट कागदपत्र जोडलेल्या प्रतिक देशमुख या ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता यांनी जलसंधारण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांना पत्र पाठवून या कागदपत्रांच्या वैधतेबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. या विभागांकडून अहवाल आल्यानंतर संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला जाईल, असे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी सांगितले.

Nashik ZP
Eknath Shinde : MMR मधील 'या' महापालिका, नगरपालिकांसाठी Good News! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

अशी आहेत बनावट कागदपत्र
सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या दाखल्यावर लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या सह्या आहेत. याच पद्धतीने काम पूर्ण केल्याचे दाखले जोडलेल्या इतर कागदपत्रांवरही पत्ते चुकीचे असणे, एका विभागाच्या कामावर इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सही व शिक्क्यांचा वापर करणे आदी अनियमितता असल्याचे सांगितले जाते.

असा आहे शासन निर्णय
टेंडर स्विकृतीपूर्वी टेंडरसोबत जोडलेल्या कागदपत्रात, कार्यारंभ आदेश स्तरावर व ते निर्गमित केल्यानंतर अथवा टेंडर कालावधी, दोषदायित्व कालावधी व पत्रव्यवहार यात व देयक अदा करताना कोणतीही कागदपत्रे खोटी असल्याचे आढळून आल्यास संबंधित अभियंता यांनी भारतीय दंड विधान संहितेप्रमाणे कंत्राटदाराविरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे २०१८ च्या शासन निर्णयात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com