Pune : 'या' चार भागात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 4 हजारांहून अधिक सदनिका बांधण्याचे उद्दिष्ट

PM Awas Yojana
PM Awas YojanaTendernama
Published on

पुणे (Pune) : केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महापालिकेकडून दुसऱ्या टप्प्यात तब्बल चार हजारांहून अधिक सदनिका बांधण्याचे उद्दिष्ट पुणे महापालिका प्रशासनाने ठेवले आहे. शहरातील बालेवाडीसह हडपसर, कोंढवा, धानोरी व वडगाव खुर्द अशा वेगवेगळ्या भागांत या सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे आर्थिक दुर्बल घटकांना त्याचा अधिक फायदा होण्याची शक्‍यता आहे.

PM Awas Yojana
Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'या' पत्राला मेट्रोकडून केराची टोपली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘पंतप्रधान आवास योजने’च्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर राज्य सरकारने ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरे बांधण्याचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले होते. महापालिकेकडून या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत २ हजार ६५८ इतक्‍या सदनिका बांधण्यात आल्या. हडपसर येथे तीन, खराडी व वडगाव येथे प्रत्येकी १ गृहप्रकल्पामध्ये संबंधित घरे शहरातील साडेसात ते आठ लाख रुपयांची मर्यादा असणाऱ्या नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गृहप्रकल्पांचे उद्‌घाटन झाले होते.

PM Awas Yojana
Mumbai : राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट! कंत्राटदारांचे 89 हजार कोटी थकीत; कारण काय?

दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत उर्वरित नागरिकांना आता परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा आढावा घेतला. महापालिकेकडून यापूर्वी बांधण्यात आलेल्या काही गृहप्रकल्पांसाठी रस्त्यांचा अभाव व अन्य तांत्रिक कारणांमुळे महापालिकेच्या सफाई कामगारांसह सहा लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. ४ हजार १७६ इतकी सदनिकांची संख्या असणार आहे. महापालिकेकडे पंतप्रधान आवास योजनेसाठी यापूर्वी ८५२ जणांनी अर्ज दाखल केले असल्याची माहिती महापालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यांनी दिली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना या घरांचा उपयोग होईल. याबरोबरच वैयक्तिक स्वरूपात घरकुल, भागीदारी तत्त्वावरील परवडणारी घरे, भाडे तत्त्वावरील परवडणारी घरे व व्याज अनुदान योजना अशा चार प्रकारांमध्ये घरे बांधणी प्रस्तावित आहे.

- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, महापालिका

* पंतप्रधान आवास योजनेस पात्र होण्यासाठीचे नियम

- आर्थिक दुर्बल घटकांसाठी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न मर्यादा ६ लाखांपेक्षा जास्त नसावे

- इच्छुक लाभार्थ्यांनी युनिफाइड वेब पोर्टलवर नोंदणी करणे आवश्‍यक

- केंद्र सरकारकडून दीड लाख, तर राज्य सरकारकडून दोन लाख रुपयांचे अनुदान

- ३० चौरस मीटर ते ४५ चौरस मीटरपर्यंतच घरे असणार

पंतप्रधान आवास योजनेतील प्रस्तावित घरे/गृहप्रकल्प

ठिकाण घरांची संख्या गृहप्रकल्पाचे क्षेत्रफळ (चौ.मी.मध्ये)

बालेवाडी - २९६ २,५९९

धानोरी - ६७६ ८,९२४

कोंढवा - ७३६ १५,३३३

हडपसर - २००० ३३,९०२

वडगाव खुर्द - ४६५ ४,८००

-------------------------------

एकूण - ४१७३ ६५,५५८

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com