Pune : कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न; 'या' सिस्टीमचा वापर

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : महापालिकेत एकच काम एकाच ठिकाणी वारंवार करणे, काम न करता बिल काढणे, काम एका ठिकाणी अन् ते केले दुसऱ्याच ठिकाणी, कामाची गुणवत्ता तपासली की नाही, याची माहिती एकत्र मिळत नसल्याने सावळा गोंधळ दिसून येतो. आता हा प्रकार कमी करून कामामध्ये पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. यासाठी इंटेलिजंट वर्क मॅनेजमेंट सिस्टीम (आयडब्ल्यूएमएस) लागू केली आहे. या प्रणालीत सर्व विभागांची ९० टक्के माहिती अंतर्भूत केली आहे. पुढील दोन महिन्यांत ही सर्व माहिती सामान्य नागरिकांनाही पाहता येणार आहे.

Pune
Pune : वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी 'मिसिंग लिंक'ची सखोल माहिती महापालिकेकडून तयार

पुणे महापालिकेत दरवर्षी महसुली व भांडवली कामे मिळून सुमारे साडेचार ते पाच हजार कोटी रुपयांचे टेंडर काढले जातात. मोठ्या रकमेच्या ठरावीक कामांवर अधिकाऱ्यांचे लक्ष असते; पण बहुतांश कामे नजरेतून सुटतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून कामाचा दर्जा, निधीचा वापर यावरून सावळा गोंधळ सुरू आहे. याची माहितीही सहज उपलब्ध होत नाही. यातून निधीचा अपव्यय होत आहे. हे प्रकार थांबविण्यासाठी व महापालिकेच्या कामात शिस्त येण्यासाठी तत्कालीन आयुक्त विक्रम कुमार, शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या पुढाकारातून ‘आयडब्‍ल्यूएमएस’ प्रणाली महापालिकेत आणण्याचा निर्णय घेतला. इनोमाइज टेक्नॉलॉजीज प्रा.लि. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रोहन आजगेकर यांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) सव्वा कोटी रुपये देऊन प्रणाली तयार करून दिली आहे.

Pune
Mumbai : 'त्या' महापालिकेचा स्तुत्य उपक्रम; पारदर्शक व सुसूत्र टेंडर प्रक्रियेसाठी तज्ज्ञांची समिती

...अशी सुरू झाली अंमलबजावणी
सन २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन वर्षांत संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये पथ, भवन रचना, मलनिःसारण, उद्यान, विद्युत यासह अन्य विभाग, १५ क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळ कार्यालयांचा समावेश केला आहे. विकासकामे किंवा देखभाल-दुरुस्तीच्या कामांचे पूर्वगणन पत्रक तयार करणे, प्रस्ताव तयार करणे, प्रस्तावाला मान्यता घेणे, कामाचे कार्यादेश देणे, कामाची गुणवत्ता तपासणे, त्यानंतर त्याचे बिल देणे ही कामे अभियंते करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळेत बचत होत आहे. २०२३-२४मध्ये संगणकीय प्रणालीचा वापर करून सहा हजार ४५१ कामांचे एक हजार ४५४ रुपयांचे बिल दिले आहे. २०२४-२५मध्ये आतापर्यंत चार हजार २७० कामांचे सुमारे १०२ कोटी रुपयांचे बिल दिले आहे.

भ्रष्टाचारावर येणार निर्बंध :
संगणकीय प्रणालीमध्ये भौगोलिक माहिती प्रणालीशी (जीआयएस) कामाचे ठिकाण जोडले जाणार आहे. काम सुरू होण्यापूर्वी, काम सुरू असताना व काम पूर्ण झाल्यानंतरचे छायाचित्र संगणकीय प्रणालीवर जोडले जातील. तसेच अक्षांश-रेखांशमुळे कामाची सत्यता पडताळणे सहज शक्य होणार आहे. महापालिकेत यापूर्वी काम न करता बिल काढणे, काम अर्धवट ठेवून पूर्ण पैसे मंजूर करणे यासारखे प्रकार घडले आहेत. त्यामुळे अशा भ्रष्टाचारावर निर्बंध येणार आहे.

Pune
Pune : अरे बापरे! यंदा पहिल्यांदाच महापालिकेचा उत्पन्नापेक्षा खर्च कमी; कारण काय?

‘‘गेल्या तीन वर्षांपासून संगणकीय प्रणाली अद्ययावत करत सर्व विभाग जोडले जात आहेत. ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. कामात पारदर्शकता वाढली आहे. या संगणकीय प्रणालीचे सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. ही प्रणाली नागरिकांनाही पाहता यावी, यासाठी सध्या काम सुरू आहे. त्यासाठी सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लागेल.’’
- प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका

‘‘आयडब्ल्यूएमएस प्रणालीमुळे महापालिकेची टेंडर कार्यप्रणातील सुधारणा झाली आहे. प्रशासकीय मान्यता घेतली की नाही, तांत्रिक बाबांची मान्यता आहे की नाही, तरतूद किती आहे? यासह अन्य माहिती त्यात लगेच उपलब्ध होईल. कामाचा दर्जा राखला जाईल. महापालिकेचे कामकाज गतिमान करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.’’
- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com