Mumbai : 'त्या' महापालिकेचा स्तुत्य उपक्रम; पारदर्शक व सुसूत्र टेंडर प्रक्रियेसाठी तज्ज्ञांची समिती

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)Tendernama
Published on

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील रस्ते, पदपथ, गटारे, इमारती, नाले तसेच पाणी पुरवठा, मलनि:स्सारण, विद्युत अशा नागरी सुविधांची कामे करतांना टेंडर प्रक्रियेत सूसुत्रता व पारदर्शकता येण्यासाठी तज्ज्ञ निवृत्त शासकीय अधिकाऱ्यांची तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Mumbai : कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला सीआरझेडचा ग्रीन सिग्नल

यात शासनाचे निवृत्त सचिव अथवा सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे समकक्ष मुख्य अभियंता या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याचप्रमाणे सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता आणि महानगरपालिकेचे निवृत्त शहर अभियंता हे सदस्य असतील. महानगरपालिकेचे प्रकल्प नियोजन कार्यकारी अभियंता हे समितीचे सदस्य सचिव असतील. नागरी सुविधांची कामे करताना तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर टेंडर काढण्यात येते. ही टेंडर प्रक्रिया सुनियोजित व गतीशील होण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांची टेंडर शर्ती / पूर्व अहर्ताबाबत तांत्रिक समिती स्थापन केली आहे.

Navi Mumbai Municipal Corporation (NMMC)
Mumbai : मुंबईकरांना नव्या वर्षात मिळणार मोठी भेट! BMC ने काय केली घोषणा?

विविध कामांची टेंडर काढतांना त्यामध्ये कामाच्या स्वरुपानुसार काही बदल करण्यात येतात. टेंडर सादर करताना स्टँडर्ड टेंडर बनवून टेंडरमध्ये सारखेपणा येण्यासाठी प्रत्येक कामाचे टेंडर अद्ययावत शासन निर्णयाप्रमाणे शहर अभियंता यांच्या मंजुरीनंतर प्रसिध्दीसाठी पाठविण्यात येतात. टेंडर प्रक्रियेत अधिक सूसुत्रता व पारदर्शकता येण्यासाठी आणि कामाचा वेग वाढवून जलद निपटारा होण्याच्या दृष्टीने तसेच अर्थसंकल्पात नमूद कामे त्याच अर्थसंकल्पीय तरतूदीनुसार पूर्ण होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. त्यास अनुसरून प्रस्तावित कामांचे अंदाजपत्रक व पूर्ण झालेल्या टेंडरच्या सर्व नस्ती संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत कार्यकारी अभियंता (प्रकल्प नियोजन) यांचे अधिनस्त असलेल्या उपअभियंता यांनी तपासून व छाननी करुन कार्यकारी अभियंता (प्रकल्प नियोजन) यांच्यामार्फत शहर अभियंता शिरीष आरदवाड यांच्याकडे टेंडर मंजुरीसाठी सादर करायचे आहेत.

या कामामध्ये सूसुत्रता येण्याकरिता व टेंडरविषयक कागदपत्रे अद्ययावत करण्याकरिता टेंडर शर्ती / पूर्व अहर्तांबाबत तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये निवृत्त सचिव अथवा शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग वा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि समकक्ष मुख्य अभियंता या समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्याचप्रमाणे सिडकोचे निवृत्त मुख्य अभियंता आणि महानगरपालिकेचे निवृत्त शहर अभियंता हे सदस्य असतील. महानगरपालिकेचे प्रकल्प नियोजन कार्यकारी अभियंता हे समितीचे सदस्य सचिव असतील. या टेंडरविषयक तांत्रिक समितीमुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या नागरी सुविधा कामांमध्ये सुनियोजितपणा व पारदर्शकता येणार असून कामकाजाचा वेगही वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com