Pune : ठेकेदाराकडून डांबर खरेदी करताना महापालिकेच्या तिजोरीला पडतोय खड्डा तरी...

PMC
PMCTendernama
Published on

पुणे (Pune) : ठेकेदाराकडून डांबर खरेदी करताना महापालिकेचे प्रतिटन साडे सहा हजार ते सात हजार रुपयांचे नुकसान होत आहे. यात ठेकेदारांचे भले होत आहे तर महापालिकेच्या तिजोरीला खड्डा पडत आहे.

PMC
Pune : सिंहगड रस्त्यावरील कोंडी अखेर सुटणार; महिनाभरात सुरु होणार 'तो' पूल

या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी माजी स्थायी समिती अध्यक्ष नीलेश निकम यांनी पत्रकार परिषदेत केली. यासंदर्भातील निवेदन आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना दिले आहे. गेल्या अनेक वर्षापासून महापालिका थेट डांबर उत्पादकांकडून पेट्रोलियम कंपन्यांकडून डांबर खरेदी करत होती. पण तीन वर्षापूर्वी ठेकेदाराकडून डांबर खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याचे नियम व अटी ठराविक ठेकेदाराला फायदेशीर ठरली अशा ठेवण्यात आल्या होत्या. अपेक्षेप्रमाणे ठरावीक ठेकेदाराला निविदा मिळाल्यानंतर त्याच्याकडून २४ ऑगस्ट २०२४ ते २५ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत महापालिकेने २३०१ मेट्रीक टन डांबराची खरेदी केली आहे. ही खरेदी महापालिकेने जर थेट पेट्रोलियम कंपनीकडून केली असती तर महापालिकेला प्रतिटन साडे सहा हजार ते सात हजार रुपयांची सूट मिळाली असती.

PMC
प्रवाशांसाठी गुड न्यूज! Pune Railway Station वरून सुटणाऱ्या 64 गाड्यांचा 'असा' वाचणार वेळ

पण आता ही सूट ठेकेदाराला मिळत आहे, यात महापालिकेऐवजी थेट ठेकेदाराचा फायदा होत आहे. तसेच महापालिकेच्या प्रकल्पात डांबराचा ट्रक पाठविल्यानंतर पूर्ण माल उतरविलेला नाही. दहा ट्रक डांबराची चोरी झाली आहे, असा आरोप निकम यांनी केला आहे.

एकच ट्रक दोन ठिकाणी

हाच ठेकेदार महापालिकेसह सार्वजनिक बांधकाम विभागालाही डांबर पुरवठा करतो. पेट्रोलियम कंपन्यांनी ‘सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ॲप्लिकेशन उपलब्ध करून दिले आहे. त्यात एकच ट्रक एकाच वेळी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला डांबर पुरवठा केल्याचे कागदपत्र मिळाले आहेत. त्यामुळे हा ठेकेदार महापालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग या दोघांपैकी एकाची फसवणूक करत आहे, असा आरोप निकम यांनी केला आहे.

‘डांबराच्या टेंडरबाबत आयुक्तांकडे तक्रार केली असेल तर कागदपत्रांची तपासणी करून यात योग्य ती कारवाई केली जाईल.’

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com