Pune Railway Station
Pune Railway StationTendernama

प्रवाशांसाठी गुड न्यूज! Pune Railway Station वरून सुटणाऱ्या 64 गाड्यांचा 'असा' वाचणार वेळ

Pune : पुणे स्थानकावरून दररोज सुमारे १५० रेल्वे धावतात.
Published on

पुणे (Pune) : पुणे रेल्वे प्रशासनाने पुण्याहून धावणाऱ्या ६४ रेल्वेच्या ‘लूज मार्जिन’मध्ये (अतिरिक्त वेळ) घट केली आहे. त्यामुळे ६४ रेल्वेच्या वेळेत बचत झाली. पुणे-मनमाड ‘सेक्शन’मध्ये धावणाऱ्या सर्वाधिक गाड्यांचा यात समावेश आहे. गाड्यांच्या धावण्याच्या वेळेत घट झाल्याने प्रवाशांच्या वेळेत किमान १० ते १५ मिनिटांची बचत झाली आहे. रेल्वेगाड्या वेळेवर धावाव्यात, यासाठी देखील परिचालन विभाग प्रयत्न करीत आहे.

Pune Railway Station
Pune : सिंहगड रस्त्यावरील कोंडी अखेर सुटणार; महिनाभरात सुरु होणार 'तो' पूल

पुणे स्थानकावरून दररोज सुमारे १५० रेल्वे धावतात. यातील काही गाड्या पुणे स्थानकावरून प्रवास सुरू करतात, तर काही गाड्या पुणे स्थानकावरून पुढच्या प्रवासाच्या दिशेने जातात. यातील ६४ रेल्वे गाड्यांना पुणे विभागातील विविध सेक्शनमध्ये देण्यात आलेली अतिरिक्त वेळ घालविण्यात आली आहे. विविध कारणासाठी रेल्वे प्रशासनाच्या वेळापत्रकात प्रत्येक गाडीसाठी अतिरिक्त वेळेची तरतूद केली असते. मात्र, यामुळे प्रवासाचा वेळ वाढतो. परिणामी प्रवाशांना गंतव्यस्थानी पोहोचण्यासाठी उशीर होतो.

Pune Railway Station
छत्रपती संभाजीनगर येथील नगर नाका ते केंब्रिज चौक रस्त्याबाबत केंद्राकडे नव्याने प्रस्ताव

का दिला जातो अतिरिक्त वेळ?

- रेल्वे गाडीला झालेला विलंब भरून काढण्यासाठी

- मार्ग व्यस्त असेल, तर चालक गाडीचा वेग कमी करून गाड्यांचे परिचालनात सुसूत्रता आणतो.

- एखाद्या सेक्शनमध्ये ‘ब्लॉक’ असेल, त्यावेळी गाड्यांची वाहतूक थांबवली जाते. याप्रसंगी होणारा उशीर भरून काढला जातो.

- प्रवासात काही घडले किंवा चैन ओढून रेल्वे थांबवली, त्यावेळी रेल्वे पुढच्या ‘सेक्शन’मध्ये वेळेवर धावावी.

Pune Railway Station
Pune : रिंगरोडसाठी निधीची अडचण; भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी 4 हजार कोटींची...

‘या’ गाड्यांच्या अतिरिक्त वेळेत बदल

रेल्वे - वेळ

पुणे - मुंबई डेक्कन एक्स्प्रेस - १२ मिनिटे

पुणे - एर्नाकुलम एक्स्प्रेस - २५ मिनिटे

पुणे - लखनौ एक्स्प्रेस - ३५ मिनिटे

पुणे - अहमदाबाद एक्स्प्रेस - ३५ मिनिटे

एकूण ६४ रेल्वे गाड्यांचा अतिरिक्त वेळ कमी करण्यात आला आहे.

Pune Railway Station
Eknath Shinde : विमानतळाच्या फनेल झोनमधील इमारतींबाबत सरकारने काय घेतला निर्णय?

पुण्याहून सुटणाऱ्या ६४ रेल्वेच्या वेळेत बदल करून या गाड्यांचे ‘सेक्शन’मधील अतिरिक्त वेळ कमी केला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या वेळेत बचत होत आहे. रेल्वे गाड्या वेळेवर धावाव्यात, यासाठीदेखील प्रयत्न केले जात आहे.

- डॉ. रामदास भिसे, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापन, पुणे

Tendernama
www.tendernama.com