Pune : जलतरण तलावांत असुरक्षितता कायम; देखभाल दुरुस्तीवर लाखोंचा खर्च होऊनही सुविधांची वानवा

Swimming Pool
Swimming PoolTendernama
Published on

पुणे (Pune) : तुटलेल्या फरशा, स्वच्छ व निर्जंतुक पाण्याचा अभाव, अंघोळ व पिण्यासाठीदेखील पाणी नसणे, शौचालये, स्वच्छतागृहांची झालेली दुरवस्था, तर दुसरीकडे जीवरक्षक, प्रशिक्षक यांच्यासह सुरक्षिततेच्या साधनांची कमतरता... हे चित्र आहे महापालिकेच्या शहरातील जलतरण तलावांचे. अशा अनेक गैरसोयींचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. देखभाल दुरुस्तीवर दरवर्षी लाखो रुपये खर्च होऊनही असे जलतरण तलाव सुविधांअभावी बंद पडून आहेत.

Swimming Pool
Pune : पुणेकरांचा विस्कळीत झालेला प्रवास सुरळीत कधी होणार?

दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरात फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. त्यामुळे नागरिकांचा ओघ जलतरण तलावांकडे वाढू लागला आहे. महापालिकेने शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये ठिकठिकाणी जलतरण तलावांची व्यवस्था केलेली आहे. महापालिकेच्या क्रीडा विभागामार्फत जलतरण तलावांचे व्यवस्थापन केले जाते. काही जलतरण तलावांचे अपवाद वगळता उर्वरित जलतरण तलावांच्या देखभाल दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करूनही तलावांची अवस्था वाईट असल्याचे पाहणीत आढळून आले आहे.

Swimming Pool
Pune : पुणेकरांचे वांदे! पीएमपीच्या बसची बॅटरी का होतेय डाऊन?

अशी आहे अवस्था

- महापालिकेच्या जलतरण तलावांमध्ये निकृष्ट दर्जाची कामे

- अनेक ठिकाणी अंघोळीसाठी पाण्याचा तसेच स्वच्छतागृह व शौचालयांचा अभाव

- रंगकाम अर्धवट अवस्थेत

- काही जलतरण तलावांमधील पाण्यात शेवाळ

- तलावाच्या परिसरातच कचरा, राडारोडा पडलेला

- तलावांमधील फरशा तुटलेल्या अवस्थेत

- काही तलावांच्या ठिकाणी महिला प्रशिक्षक, जीवरक्षकांचा अभाव

- काही तलावांमध्ये पोहण्यासाठी आवश्‍यक रबरी रिंग, रबरी ट्युब, फायबर ड्रमदेखील नाही

- देखभाल दुरुस्ती, सोयीसुविधा व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष

समाविष्ट गावांमध्ये अभाव

महापालिकेकडून शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांत जलतरण तलाव बांधण्यात आले आहेत. मात्र शहरीकरण झपाट्याने वाढत असून महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये जलतरण तलावांसाठी मागणी असूनही तेथे अभाव आहे. मांजरी बुद्रुक, शेवाळेवाडी, खडकवासला, किरकटवाडी, हांडेवाडी, उंड्री, पिसोळी, वडाची वाडी यासारख्या गावांमधील नागरिकांना महापालिकेच्या जुन्या हद्दीत किंवा खासगी जलतरण तलावांमध्ये पोहण्यासाठी यावे लागत आहे.

महापालिकेच्या सर्व जलतरण तलावांचे ‘नॅशनल लाइफ सेव्हिंग सेफ्टी ऑडिट’द्वारे ऑडिट करण्यात आले आहे. त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून अंमलबजावणी करण्याचे आदेश जलतरण तलाव चालविणाऱ्यांना दिले आहेत. आवश्‍यक सोयीसुविधा, सुरक्षिततेबाबत योग्य काळजी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नागरिकांना पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासह त्यांच्या जिवाची काळजी घेण्यावरही भर दिला जात आहे.

- किशोरी शिंदे, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका

असे आहेत तलाव

- महापालिकेचे एकूण जलतरण तलाव - ३५

- सध्या सुरू असलेले - २६

- पुढील महिन्यात सुरू होणारे - ०४

- चालविण्यासाठी देण्याच्या प्रस्तावातील - ०३

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com