Pune : महापालिकेका नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या 'या' दोन टप्प्यातील कामांना देणार गती

Pune
PuneTendernama
Published on

पुणे (Pune) : महापालिकेच्या नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या संगमवाडी ते बंडगार्डन पूल या पहिल्या टप्प्यातील ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. जून महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्यातील बहुतांश काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. याबरोबरच बंडगार्डन पूल ते मुंढवा या दुसऱ्या टप्प्याचे कामही ३२ टक्‍क्‍यांपर्यंत पूर्ण झाले आहे. दोन्ही टप्प्यातील कामांना गती देण्यावर महापालिकेकडून भर दिला जात आहे.

Pune
Pune : पुण्याच्या पाण्याबाबत विधीमंडळात काय झाला निर्णय?

मुळा - मुठा नदीकाठी वाढलेले शहरीकरण, प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीमध्ये सोडणे, नदीमध्ये कचरा टाकून नदी प्रदूषणात भर टाकली जात आहे. दरम्यान, अहमदाबादमधील साबरमती नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या धर्तीवर पुणे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडून मुळा - मुठा नदीकाठ सुधार प्रकल्प मार्च २०२२ पासून हाती घेण्यात आला. त्यानुसार, महापालिकेने संगमवाडी ते बंडगार्डन पूल (स्ट्रेच ९) हा ३.७ किलोमीटरचे काम सुरू केले.

Pune
Pune : प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 'या' स्थानकांवर बसविणार डिजिटल डिस्प्ले बोर्ड

अनेक अडथळ्यांची शर्यत पार करत या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. साडेतीन किलोमीटरच्या या पहिल्या टप्प्यातील ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत दोन्ही बाजूला घाट व काठबांधणीची कामे झाली आहेत. लॅंडस्केपींगचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यानंतर वृक्षारोपण केले जाणार आहे. याबरोबरच नदीकाठच्या दोन्ही बाजूंना साडेतीन किलोमीटर इतक्‍या अंतराची नागरिकांना चालण्यासाठीची व्यवस्था (प्रोमीनाड) केली आहे. जूनपर्यंत साडेतीन पैकी दोन किलोमीटरचे काम पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काम पाहण्यासाठी विद्यार्थी, नागरिक व विविध संस्थांचे अधिकारी व कर्मचारी येऊ लागले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे यांनी दिली.

Pune
Mumbai : 15 वर्षात रस्त्यांवर 21 हजार कोटींचा खर्च; तरीही मुंबई खड्ड्यात..

दुसरा टप्पा पाच किलोमीटरचा

बंडगार्डन पूल ते मुंढवा या दरम्यानच्या पाच किलोमीटरच्या दुसऱ्या टप्प्यातील देखील ३२ टक्के काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यातील पाच पैकी चार किलोमीटर काठबांधणीचे काम झाले आहे. तसेच घाटांचीही कामे करण्यात आली आहेत. वडगाव शेरीतील नदीच्या पुर पातळीत येणाऱ्या विविध धर्मीयांच्या तीन स्मशानभूमी स्थलांतरित करण्याचे काम येत्या दीड महिन्यात पूर्ण होइल. याबरोबरच नागरिकांना चालण्यासाठी दोन्ही बाजूंना तीन किलोमीटरचे प्रोमीनाड तयार केले आहेत.

मुळा - मुठा नदीकाठ सुधार प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. जूनपर्यंत पहिल्या टप्प्यातील दोन किलोमीटरचे काम पूर्ण होईल. तसेच दुसऱ्या टप्प्यातील काम देखील ३२ टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचले आहे. संबंधित कामाला गती देण्यात आली आहे.

- युवराज देशमुख, प्रमुख, विशेष प्रकल्प विभाग, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com