Pune : पीएमपीएमएलचा तोटा वाढत चालल्याने महापालिका देणार...

PMP
PMPTendernama
Published on

पुणे (Pune) : शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा मुख्य भाग असलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाचा (पीएमपीएमएल) तोटा वाढतच चालला आहे. अशा स्थितीमध्ये महापालिकेने पीएमपीला संचलन तुटीपोटी ३० कोटी ८० लाख रुपये देण्याचे निश्‍चित केले आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवला आहे.

PMP
Pune : 'या' दोन विभागांमुळे महापालिकेला यंदा 100 कोटींपेक्षा अधिक महसूल

पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएच्या हद्दीमध्ये पीएमपीएमएलकडून बससेवा पुरविली जाते. दोन्ही शहरे व ग्रामीण भागातील नागरीकांना या बससेवेचा चांगला फायदा होतो. यामध्ये खासगी ठेकेदारांच्या बसची संख्या मोठी आहे. असे असतानाही काही वर्षांपासून पीएमपीचा तोटा वाढत चालला आहे, पीएमपीएमएलच्या २०२३-२४ च्या ताळेबंदानुसार संचलन तूट रक्कम ७०६ कोटींपर्यंत पोचली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पीएमपी संयुक्त उपक्रम असल्याने दोन्ही महापालिकांकडून ६०:४० या प्रमाणानुसार संचलन तूट म्हणून द्यावे लागतात. पुणे महापालिकेच्या ६० टक्के हिश्‍शानुसार ४२३ कोटी रुपये होतात. त्यापैकी महापालिकेकडून पीएमपीला उचल स्वरूपात अदा केलेली समायोजित रक्कम, दरमहा अदा केलेली रक्कम, या प्रकारे ३९२ कोटी ४९ लाख रुपये देण्यात आलेली आहे.

PMP
Mumbai Pune Expressway वरून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! मिसिंग लिंकच्या टोलबाबत आली महत्त्वाची बातमी

उर्वरित ३१ कोटी ३१ लाख या रकमेमधून महापालिका मुद्रणालय विभागाची थकबाकी ४९ लाख ४६ हजार इतकी रक्कम समायोजित करून उर्वरित ३० कोटी ८० लाख रुपये महापालिका पीएमपीला देणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला आहे. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर पीएमपीला काही प्रमाणात आर्थिक आधार मिळण्याची शक्‍यता आहे. याबरोबरच महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मासिक, त्रैमासिक, सहामाही व वार्षिक पास पीएमपीकडून दिला जातो. याबरोबरच महापालिकेचे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, स्वातंत्र्य सैनिक अशा विविध घटकांनाही पास दिले जातात. या पाससाठी महापालिकेकडून २३ कोटी ५७ लाख ८८ हजार रुपये पीएमपीला दिले आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com