Mumbai Pune Expressway वरून प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! मिसिंग लिंकच्या टोलबाबत आली महत्त्वाची बातमी

Mumbai Pune expressway, Missing Link
Mumbai Pune expressway, Missing LinkTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) खंडाळा घाटात होणारी वाहतूक कोंडी फोडण्याबरोबरच प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) १३ किलोमीटर लांबीचा ‘मिसिंग लिंक’ (Missing Link) मार्ग उभारला जात आहे. ऑगस्टअखेर त्याचे काम पूर्ण होणार आहे. सुमारे नऊ किलोमीटरचा बोगदा आणि महाकाय पुलावरून होणारा हा प्रवास टोलमुक्त असणार आहे. (Mumbai-Pune Expressway Missing Link Toll News)

Mumbai Pune expressway, Missing Link
Pune : डांबर घोटाळा प्रकरणी महापालिका कारवाई करणार का?

या मार्गासाठी अतिरिक्त टोल लागणार नाही. ‘मिसिंग लिंक’च्या कामाचा भाग म्हणून खोपोली ते कुसगावदरम्यानचा साडेसहा किलोमीटर लांबीच्या तीनपदरी असलेल्या द्रुतगती मार्गाचे चौपदरीकरण केले जाणार आहे.

तसेच नऊ किलोमीटर लांबीचा बोगदा, ८५० मीटर व ६५० मीटर लांबीचे खोल दरीवर दोन ‘वायडक्ट पूल’ उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांचा मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ २०-३० मिनिटांनी वाचणार आहे.

Mumbai Pune expressway, Missing Link
Solapur : सोलापुरातील E-Bus चार्जिंग स्टेशनचे काम का रखडले?

‘मिसिंग लिंक’वरील प्रवासाला टोल लागणार का, हा प्रश्न वाहनचालकांना सतावत होता; मात्र या मार्गावरील प्रवासासाठी कोणताही अतिरिक्त टोल लागणार नसल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

टोलवसुलीची मुदत वाढली

दरम्यान, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीची मुदत २०३० पर्यंत होती; मात्र ‘मिसिंग लिंक’मुळे ती २०४५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com