Pune : शहरातील ओढे-नाले, कालव्यांवरील पुलांचे महापालिका करणार 'स्ट्रक्चरल ऑडीट'

Pune PMC
Pune PMCTendernama
Published on

पुणे (Pune) : शहराच्या वेगवेगळ्या भागातील ओढे-नाले, कालव्यांवर महापालिकेने पुल बांधले, मात्र संबंधित पुलांची स्थिती नेमकी काय आहे, याची आत्तापर्यंत पाहणी झालेली नाही. त्यामुळे संबंधित पुलांची सद्यःस्थिती काय आहे, त्यामध्ये काय सुधारणा कराव्या लागतील, यासंदर्भात संबंधित पुलांचे महापालिकेकडुन "स्ट्रक्‍चरल ऑडीट' केले जाणार आहे.

Pune PMC
Pune : शिवाजीनगर एसटी स्थानक होणार पूर्वीच्याच ठिकाणी; महामंडळ आणि महामेट्रोत करार

शहरात आंबील ओढा, भैरोबा नाल्यासह अनेक मोठे नाले-ओढे आहेत. याबरोबरच मुठा डावा कालवा देखील शहरातुन ग्रामीण भागामध्ये जातो. संबंधित नाले, ओढे, कालव्यावर महापालिका प्रशासनाकडुन अनेक वर्षांपुर्वी छोटे-मोठे पुल बांधण्यात आले. या पुलांवरुन मोठ्या प्रमाणात वाहतुक होते. त्यापैकी काही पुल जुने झाले असल्याने ते धोकादायक झाले आहेत का? संबंधित पुलांची सद्यःस्थिती नेमकी कशी आहे? याबाबतची पाहणी महापालिकेकडुन केली जाणार आहे. या पुलांचे महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाकडुन स्ट्रक्‍चरल ऑडीट केले जाणार आहे, त्यातुन पुलांच्या सद्यःस्थितीची माहिती महापालिकेस मिळणार आहे. त्यानंतर पुलांच्या कामांसंदर्भात पुढील प्रक्रिया केली जाणार आहे.

Pune PMC
Mumbai : बीएमसीच्या ‘त्या’ 3 मोक्याच्या जागांची विक्री रद्द

याबाबत महापालिकेच्या विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख म्हणाले, 'ओढे-नाले व कालव्यांवरील पुल सध्या सुरु आहेत. मात्र, या पुलांचे नेमकी काय स्थिती आहे, हे जाणुन घेणे गरजेचे आहे. त्यातुन पुलाची डागडुजी करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यात होणारे धोके टाळणे शक्‍य होईल. त्यादृष्टीने या पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट करण्याचे काम केले जाणार आहे.'

नदीवरील ३८ पैकी ११ पुलांचे काम पुर्ण, उर्वरीत काम दुसऱ्या टप्प्यात

महापालिकेने दोन वर्षांपुर्वी नदीवरील ३८ पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडीट केले होते. पुलांची कामे करण्यासाठी महापालिकेने ३५ कोटी रुपयांची तरतुद केली होती. त्यातुन विशेष प्रकल्प विभागाने ११ पुलांची कामे केली. तर आता उर्वरीत २७ पुलांच्या कामासाठी अंदाजपत्रकात तरतुद केली जाणार आहे. त्यानुसार, दुसऱ्या टप्प्यात ही कामे केली जाणार आहे. त्यासाठीच्या निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com