Pune : नदी पात्रातील रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे होण्यासाठी महापालिका करणार 'हा' उपाय

Road
RoadTendernama
Published on

पुणे (Pune) : एरंडवणे, रजपूत वस्ती ते बाबा भिडे पूल या दरम्यानच्या रस्त्याची चाळण झालेली आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांचे कंबरडे मोडत आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी अखेर महापालिका प्रशासनाने एक कोटी २५ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करताना चांगल्या दर्जाचे काम व्हावे, यासाठी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवून काम केले जाणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Road
Pune : 'त्या' गावातील नागरिकांनी का मानले महापालिका प्रशासनाचे आभार?

कोथरूड, कर्वे रस्ता, कर्वेनगर, वारजे माळवाडी, शिवणे, खडकवासला, धायरी, नऱ्हे, हिंगणे, आनंदनगर यासह सिंहगड रस्त्यावरील इतर भागांतील दुचाकीस्वारांना पेठांसह शिवाजीनगर, नगर रस्त्याला जायचे असेल किंवा पेठांमधील नागरिकांना कोथरूड, सिंहगड रस्ता भागात जायचे असेल हा रस्ता महत्त्वाचा ठरतो. रोज सुमारे १ लाख दुचाकीस्वार हा रस्ता वापरतात. त्यामुळे दांडेकर पूल, शास्त्री रस्ता, कर्वे रस्ता या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी होतो. पावसाळ्यात मुठा नदीला पूर आल्यानंतर हा रस्ता काही आठवडे वाहतुकीसाठी बंद असतो. त्यामुळे याचा ताण पेठांमधील रस्ते, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्त्यावर येतो.

Road
Mumbai : रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामांवर संशयकल्लोळ; टेंडरमधील अटींप्रमाणे काम न झाल्यास कंत्राटदारावर...

एरंडवण्यातील नदीपात्रातील रस्त्याचा रजपूत वस्ती ते भिडे पूल हा सुमारे १ किलोमीटर लांबीचा रस्ता आहे. रस्त्यावर ९० पेक्षा जास्त लहान मोठे पॅचवर्क केल्याचे पाहणीत दिसून येत आहे. डांबर टाकल्यानंतर त्यावर व्यवस्थित काम न केल्याने रस्त्यात अनेक उंचवटे निर्माण झाले आहेत. आता तर पावसाळ्यात रस्त्याची खडी निघून गेल्याने अनेक खड्डे पडले आहेत. ‘या रस्त्याची दुरावस्था झाल्याने त्याचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा काढली होती. त्याला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. ठेकेदारांसोबत करारनामा झाल्यानंतर लगेच डांबरीकरणाचे काम केले जाईल,’ असे अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे यांनी सांगितले.

पोलिसांना देणार पत्र

रस्त्यावर वाहतूक सुरू ठेवून डांबरीकरण केल्यास रस्त्याचा दर्जा चांगला राहत नाही. या रस्त्यावर अनेक वर्षांपासून डांबरीकरण झालेले नाही, त्यामुळे या वेळेस व्यवस्थित काम करावे लागणार आहे. वाहतूक बंद करून डांबरीकरण करून त्यास सुकण्यासाठी पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन-तीन दिवस हा रस्ता बंद ठेवावा, यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र दिले जाणार आहे, असे दांडगे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com