Pune PMC
Pune PMCTendernama

Pune : महापालिकेकडून एकाच ठेकेदाराचे 'लाड' बंद; आता अन्य ठेकेदारांसह...

Published on

पुणे (Pune) : पुणे महापालिकेत १५६५ सुरक्षा रक्षकांच्या कंत्राटासाठी राजकीय वरदहस्त असलेल्या एकाच ठेकेदाराचे लाड पुरविण्यासाठी अटी-शर्ती निश्‍चित केल्याची टीका सुरु झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने एक पाऊल मागे घेतले आहे. हे काम एकाच ठेकेदाराला देण्याऐवजी अन्य ठेकेदारांसह विभागून दिले जाईल असे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले.

Pune PMC
Pune : पिंपरी मेट्रो मार्गावर आणखी एक स्टेशन प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

दुसरीकडे टेंडरमधील अटी शिथिल केल्यास स्पर्धा वाढून महापालिकेला आणखी चांगले ठेकेदार मिळतील यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. महापालिकेच्या सुरक्षा विभागाने बहुउद्देशीय कामगार या नावाखाली १५६५ सुरक्षा रक्षक घेण्यासाठी १३९.९२ कोटी रुपयांची निविदा काढली आहे. ही निविदा तीन वर्षांसाठी असणार आहे. यापूर्वी एका वर्षासाठीच टेंडर काढले जात होते. यंदा थेट अटी शर्ती बदलून तीन वर्षांसाठी टेंडर काढले गेल्याने संशय व्यक्त होत आहे.

Pune PMC
Pune : टीकेची झोड उठल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग; काय आहे प्रकरण?

महाराष्ट्रात सात वर्षे काम करण्याचा अनुभव अनिवार्य केल्याने अनेक कंपन्या या टेंडरसाठी अपात्र ठरणार आहेत आहे. राज्यातील बड्या राजकारण्यांशी संबंधित एजन्सीला काम देण्यासाठी हा घाट घातला गेल्याची टीका होत आहे. याविरोधात महापालिकेला ॲड. असीम सरोदे यांनी कायदेशीर नोटीसही बजावली आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, ‘‘टेंडरबाबत काही तक्रारी आल्या आहेत. यापूर्वीच्या टेंडर आणि प्रत्यक्षात कार्यादेश दिल्यानंतर आलेला कामाचा अनुभव लक्षात घेउन निर्णय होईल. या टेंडरची काम एकाच ठेकेदाराला देण्याऐवजी ते दोन-तीन ठेकेदारांमध्ये विभागातून दिले जाईल.’’

Tendernama
www.tendernama.com