Metro
MetroTendernama

Pune : पिंपरी मेट्रो मार्गावर आणखी एक स्टेशन प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

Published on

पिंपरी (Pimpri) : खडकी मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले असून महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) कमिशनर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी (सीएमआरएस) तपासणीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. सीएमआरएसची मंजुरी मिळाल्यानंतर हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. पुढील एक महिन्यात ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन खडकी मेट्रो स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.

Metro
Mumbai : 'या' जागेवर होणार धारावीतील रहिवाशांचे पुनर्वसन; 2 हजार कोटींच्या प्रकल्पाचे लवकरच टेंडर

जिल्हा न्यायालय ते स्वारगेटपर्यंत विस्तारित मेट्रो सेवा सुरू झाली आहे. पिंपरी ते स्वारगेटपर्यंत प्रवास करता येत आहे. स्वारगेटपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाल्यामुळे मेट्रो प्रवाशांची संख्या वाढली आहे. या मार्गावर ९ उन्नत आणि ६ भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. या मार्गावर पिंपरी, संत तुकारामनगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर आणि जिल्हा न्यायालय, बुधवार पेठ, मंडई आणि स्वारगेट ही स्थानके आहेत. या मार्गावर खडकी आणि रेंजहिल्स ही स्थानके संरक्षण विभागाच्या जागेवर उभारण्यात येत आहेत. त्यांच्याकडून या प्रस्तावाला मान्यता मिळून जागा महामेट्रोकडे हस्तांतरित करण्यास विलंब झाला होता. यामुळे पहिल्या टप्प्यात ही दोन्ही स्थानके वगळण्यात आली होती. मात्र, आता खडकी येथील मेट्रो स्थानकाचे काम पूर्ण झाले असून सीएमआरएसच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. सीएमआरएसकडून मेट्रो स्थानकाची तपासणी झाल्यानंतर महामेट्रोला सीएमआरएस सुरक्षा प्रमाणपत्र मिळेल. त्यानंतर हे स्थानक प्रवाशांसाठी खुले होणार आहे.

Metro
Pune : विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी आता नक्की फुटणार! काय आहे कारण?

रेंजहिल्ससाठी डिसेंबर २०२५ उजाडणार

रेंजहिल्स स्थानकाचे काम संथगतीने सुरू असून ते पूर्ण होण्यासाठी आठ ते नऊ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रो निश्चित केले आहे. त्यामुळे रेंजहिल परिसरातील नागरिकांना मेट्रो स्थानकासाठी अजून आठ ते नऊ महिने वाट पाहावी लागणार आहे.

खडकी मेट्रो स्थानकाचे थोडे काम राहिले आहे. पुढील एक महिन्यात हे स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.

- हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो

Tendernama
www.tendernama.com