Pune : ‘पीएमपी’मध्ये ठेकेदारांना पुन्हा येणार 'अच्छे दिन'! कारण...

PMP
PMPTendernama

पुणे (Pune) : मोडीत निघत असलेल्या ‘बीआरटी’ मार्गावरील (BRT) बसची संख्या वाढविण्याचा आणि त्यासाठी ४०० सीएनजी (CNG) बस भाड्याने घेण्याचा निर्णय ‘पीएमपी’च्या (PMPML) संचालक मंडळाने बैठकीत नुकताच घेतला.

PMP
Nashik : नाशिककरांना 'न्यू इअर गिफ्ट'; 'या' सहापदरी महामार्गासाठी निघाले 275 कोटींचे टेंडर

भाड्याने घेतल्या जाणाऱ्या बस १२ मीटर आकाराच्या असतील. या बस ‘बीआरटी’मधून धावणार असल्याने बसच्या दरवाजांची रचना तशी करण्यात आली आहे. या बस अन्य मार्गांवरूनही धावू शकतील. इलेक्ट्रिक बस घेण्यात अडचणी येतात. मात्र ‘सीएनजी’वरील बस उपलब्ध होण्यात कोणताही अडसर येणार नाही. सध्या इलेक्ट्रीक बससाठी वीजपुरवठ्यासंदर्भात अडचणी येत आहेत.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ‘पीएमपी’ इलेक्ट्रीक बसच्या प्रतीक्षेतच आहे. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून ‘पीएमपी’ प्रशासनाने 'सीएनजी' बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा ‘पीएमपी’ तसेच प्रवाशांना होणार आहे. प्रवासी संख्येच्या तुलनेत बसची संख्या कमी आहे. त्यामुळे बसची उपलब्धता वाढविणे आता अपरिहार्य आहे.

PMP
Nashik : लोकसभा निवडणुकीपूर्वीच होणार निफाड ड्रायपोर्टचे भुमिपूजन

ठेकेदारांवरील अवलंबित्व वाढले

या निर्णयामुळे ‘पीएमपी’मध्ये ठेकेदारांचे वर्चस्व पुन्हा वाढणार आहे. सध्या ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या ९८१, तर ठेकेदारांच्या १०९८ बस आहेत. या निर्णयानंतर ठेकेदारांच्या बसची संख्या आणखी वाढून ती १४९८ इतकी होईल.

२ लाख ९२ हजार प्रवाशांची सोय

‘सीएनजी’च्या एका बसमधून दिवसाला सरासरी ७३० प्रवाशांची वाहतूक होते. ४०० नव्या बस आल्यावर दिवसाला किमान दोन लाख ९२ हजार प्रवाशांची वाहतूक होईल. यामुळे प्रवाशांची संख्या वाढेल. याशिवाय विविध मार्गांवरील बसमध्ये प्रवाशांना जागेअभावी उभे राहून प्रवास करावा लागतो. नव्या बस येणार असल्यामुळे प्रवासी बसून प्रवास करू शकतील.

PMP
Nagpur ZP: मंजूर 256 कोटी पण मिळाले फक्त 45 कोटी; ग्रामीण भागातील विकासकामांना फटका

संचालक मंडळाच्या बैठकीत ‘सीएनजी’वरील ४०० नव्या बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय झाला. येत्या आठवड्यात याच्या टेंडर प्रक्रियेला सुरवात होईल.

- डॉ. संजय कोलते, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com