Pune
PuneTendernama

Pune : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीत पुन्हा बदल; विद्यापीठ चौक ते शिवाजीनगर कोर्टापर्यंत 'या' वाहनांना बंदी

Published on

पुणे (Pune) : गणेशखिंड रस्त्यावरील (Ganeshkhind Road) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील (SPPU) आचार्य आनंदऋषीजी महाराज चौक ते शिवाजीनगर न्यायालयादरम्यान मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या बांधकामादरम्यान वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या रस्त्यावरील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

Pune
काम अर्धवट सोडून सहा ठेकेदार पळून गेल्याने आता 'या' रस्त्यासाठी गडकरीच उतरले मैदानात

औंध रस्त्यावरील ब्रेमेन चौकातून पुणे विद्यापीठ चौकामध्ये येणाऱ्या फक्त दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश राहील. मालवाहतूक करणारी वाहने, पीएमपी आणि लक्झरी बसेसना प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : १

- शिवाजीनगर, डेक्कन परिसरात जाण्यासाठी ब्रेमेन चौकातून डावीकडून जयकर पथावरून आंबेडकर चौक सरळ साई चौकात उजवीकडे वळून सिंफनी चौकातून (रेंज हिल्स) डावीकडे वळून गुन्हे शाखेच्या युनिट चार येथून उजवीकडून कृषी महाविद्यालयामधील रस्त्याने न. ता. वाडी चौकातून सरळ सिमला चौक पुढे इच्छितस्थळी जाता येईल.

- आरटीओ पुणे स्टेशन, नगर रस्त्याकडे जाणाऱ्या वाहनांनी ब्रेमेन चौकातून डावीकडे वळून आंबेडकर चौकातून डावीकडे वळून बोपोडी चौकमार्गे जावे.

- आंबेडकर चौकातून सरळ साई चौक, खडकी पोलिस ठाण्याजवळ रेल्वे भुयारी मार्गे अथवा युनिट चार समोरून सरळ पोल्ट्री भुयारी मार्गे जावे.

- हिंजवडी, सांगवी परिसरातून सेनापती बापट रस्त्यावर जाणाऱ्या पीएमपी बसेस ऋषी मल्होत्रा चौकातून उजवीकडून परिहार चौकातून डावीकडून बाणेर रस्त्यावरून विद्यापीठ चौकमार्गे धावतील.

- विद्यापीठ चौकातून रेंजहिल्स चौकापासून पुढे शिवाजीनगरकडे येण्यासाठी गणेशखिंड रस्त्यावर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.

Pune
Pune : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणास मदत करण्याची एनएचएआयची तयारी

पर्यायी मार्ग : २

- रेंज हिल्स कॉर्नर डावीकडे वळून रेंज हिल्स रस्त्याने सिंफनी सर्कलमध्ये उजवीकडून गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या कार्यालयासमोरून शिवाजीनगर, डेक्कन परिसरामध्ये जाण्यासाठी उजवीकडून कृषी महाविद्यालयातून न. ता. वाडी सरळ सिमला ऑफिस चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.

- आरटीओ, पुणे स्टेशन परिसर, नगर रस्त्याकडे जाण्यासाठी रेल्वे भुयारी मार्ग, पोल्ट्री फार्म चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.

- सीओईपी वसतिगृहाच्या बाजूने मेट्रोचे खांब उभारण्यात येत आहेत. त्यामुळे सिमला ऑफिस चौकातून सीओईपी वसतिगृहाच्या बाजूने स. गो. बर्वे चौकाकडे प्रवेश बंद राहील.

Pune
Solapur : 54 मीटर रस्त्यासाठी तीन कोटींचे टेंडर; आठ वर्षांपासून रखडलेले काम लागणार मार्गी

पर्यायी मार्ग : ३

सिमला ऑफिस चौकातून संचेती रुग्णालयासमोरून उजवीकडून स. गो. बर्वे चौकात जाता येईल किंवा सिमला ऑफिस चौकातून संचेती रुग्णालयासमोरील भुयारी मार्गातून कामगार पुतळा चौकातून उजवीकडून इच्छितस्थळी जाता येईल.

- सिमला ऑफिस चौकातून संचेती रुग्णालयासमोरील भुयारी मार्ग ते कामगार पुतळा चौकदरम्यान दररोज रात्री १० ते सकाळी ७ वाजेपर्यंत सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.

Pune
GMLR च्या खर्चात तब्बल 6 हजार कोटींची वाढ; का वाढला खर्च?

पर्यायी मार्ग : ४

- सिमला ऑफिस चौकातून संचेती रुग्णालय चौकातून उजवीकडून स. गो. बर्वे चौकमार्गे जावे.

- संचेती चौकातून डावीकडून इंजिनिअरिंग कॉलेज चौकातून उजवीकडून आरटीओ चौक मार्गे जावे.

- पुणे-मुंबई महामार्गावरून पोल्ट्री फार्म चौकातून रेल्वे भुयारी मार्गे रेंजहिल्सकडे सर्व वाहनांना प्रवेश बंद राहील.

पर्यायी मार्ग : ५

- पोल्ट्री फार्म चौकातून पुणे-मुंबई महामार्गावरून चर्च चौकातून डावीकडून खडकी पोलिस ठाण्याजवळील रेल्वे अंडरपासमधून साई चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.

Tendernama
www.tendernama.com