Pimpri : आरटीओकडून मालवाहतूक वाहनांना आता स्वयंचलित यंत्रांच्या माध्यमातून फिटनेस सर्टिफिकेट; 10 एकर जागेवर...

RTO
RTOTendernama
Published on

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) प्रवासी आणि मालवाहतूक वाहनांना आता स्वयंचलित यंत्रांच्या माध्यमातून योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस सर्टिफिकेट) दिले जाणार आहे. त्याकरिता मोशी येथील दहा एकर जागेत स्वयंचलित चाचणी केंद्र (ॲटोमॅटिक टेस्टिंग सेंटर) उभारण्यात येत आहे. या केंद्राचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या स्वयंचलित यंत्रांमुळे वाहनांची योग्यता तपासणी अचूक करणे शक्य होणार आहे.

RTO
Pune : हाय सेक्युरिटी नंबर प्लेट बसविण्याचा विचार करताय; तर 'ही' बातमी वाचाच...

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०१६ मध्ये रस्ता सुरक्षेसंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीने परिवहन विभागाच्या विविध प्रकल्पांना मान्यता दिली होती. या प्रकल्पांना लागणारा निधी मंजूर केला होता. त्यावेळी वाहनांचे अपघात कमी करणे आणि त्यांची अचूक तपासणी करण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने राज्यात स्वयंचलित चाचणी केंद्रे उभारण्याची घोषणा केली होती. त्यात पिंपरी-चिंचवडचाही समावेश होता. पण, कोरोना काळात हा प्रकल्प मागे पडला होता. मात्र, गेल्या वर्षी परिवहन विभागाने प्रलंबित प्रकल्पांना मंजुरी दिली होती. जून २०२४ मध्ये टेंडर प्रक्रिया राबविल्यानंतर मोशी येथे कामाला सुरुवात झाली होती. गेल्या सहा महिन्यांत या प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.

RTO
Pune : पुणे शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार! कारण काय?

सध्याची तपासणीची पद्धत...

परिवहन संवर्गातील वाहनांची पहिली आठ वर्षे योग्यता तपासणी प्रत्येकी दोन वर्षांनी करण्यात येते. आठ वर्षांनंतर ही तपासणी दरवर्षी करण्यात येते. ती केल्यानंतरच वाहन रस्त्यावर चालविण्यासाठी योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. सध्या आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक ट्रॅकवर स्वतः वाहन चालवून ते योग्य आहे की नाही, याची तपासणी करतात. त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. पण, अजूनही त्यात त्रुटी राहत असल्याची टीका होत होती. मात्र, आता अवजड माल वाहतुकीची वाहने, मोठ्या आणि मध्यम प्रवासी वाहनांची योग्यता तपासणी स्वयंचलित यंत्रांच्या माध्यमातून करण्याकडे पावले टाकण्यात आली आहेत.

रोज तीनशे वाहने रांगेत

सध्या पिंपरी-चिंचवड कार्यालयाजवळील वाहन योग्यता चाचणी केंद्रावर आठ अधिकाऱ्यांमार्फत वाहनांची तपासणी केली जात आहे. सध्या या ट्रॅकची क्षमता २४० आहे. पण, नवीन स्वयंचलित चाचणी केंद्र सुरू झाल्यानंतर ही क्षमता ३०० इतकी होणार आहे. पिंपरी-चिंचवड आरटीओची वाहन योग्यता तपासणी क्षमता वाढण्याबरोबरच त्यांची तपासणी जलद होणार आहे.

अवघ्या सहा मिनिटांत तपासणी

एखादे वाहन ट्रॅकवर गेल्यावर हेडलाईट अलायनर, स्पीडो मीटर टेस्टर, रोलर ब्रेक टेस्टर, कारसाठी सस्पेंशन टेस्टर, स्टेरिंग प्ले, गिअर, स्पीड गव्हर्नर, प्रवासी वाहनांचे व्हीएलटीडी अशी त्याची विविध प्रकारची चाचणी होणार आहे. या सर्व तपासण्या स्वयंचलित यंत्रांद्वारे केवळ सहा मिनिटांत होणार आहेत.

स्वयंचलित चाचणी केंद्रावर दृष्टीक्षेप...

- ११ हजार चौरस फुटांचे चाचणी केंद्र

- २ हजार चौरस फूट क्षेत्रांवर प्रशस्त कार्यालय

- ३३ मीटरचे एकूण चार टेस्टिंग ट्रॅक

- मालवाहतूक, प्रवासी वाहनांसाठी प्रत्येकी दोन ट्रॅक

- चार इन्स्पेक्शन पीट, दररोज ३०० वाहनांची तपासणी

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com