Pune City
Pune CityTendernama

Metro : 30 लाख लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचडवमध्ये मेट्रो सेवेला कसा आहे प्रतिसाद?

Published on

पिंपरी (Pimpri) : पिंपरी-चिंचवड शहरामधून मेट्रोसेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Pune City
Solapur : सोलापूरकरांसाठी गुड न्यूज! 6 महिन्यांपासून रखडलेले समांतर जलवाहिनीचे 'ते' काम अंतिम टप्प्यात

मेट्रोसेवेला शहरात गेल्या तीन वर्षांपासून सुरुवात झाली. येथील पीसीएमसी मेट्रो स्थानकात ये-जा करण्यासाठी चार पादचारी पुलांची मंजुरी आहे. ज्वेल ऑफ पिंपरी इमारतीसमोरील पादचारी पुलाचे आणि जिन्याचे बांधकाम अद्यापही अर्धवट असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून चौक ओलांडावा लागत आहे. मात्र, आता येथील पादचारी पुलाची प्रतिक्षा संपणार असून येत्या दोन महिन्यांत हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे.

औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या तीस लाखांहून अधिक आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात दाटीवाटीची वस्ती बनली आहे. शहरात मेट्रोचे पीसीएमसी, संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी असे एकूण सहा स्थानक आहेत.

Pune City
Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर देशात पहिल्यांदाच

पिंपरी हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने चिंचवड, निगडी, तळवडे, पुनावळे, आकुर्डी, रावेत येथील नागरिकांना पुण्यामध्ये जाण्यासाठी पीसीएमसी स्थानकाचा वापर करतात. त्यामुळे सर्वाधिक प्रवासी पीसीएमसी मेट्रो स्थानकामधून ये-जा करत असल्याचे दिसून येते.

या मेट्रो स्थानकावर ये-जा करण्यासाठी चार पादचारी पुलांची मंजुरी आहे. यातील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर पुण्याच्या दिशेने मोरवाडी चौकात, महापालिका भवनासमोर आणि निगडीच्या दिशेने मोरवाडी चौकात लिफ्ट आणि जिना प्रवाशांच्या सेवेत आहे. मात्र, निगडीच्या दिशेने महापालिकेच्या समोरील बाजूस जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी अर्धवट पिलर बांधण्यात आले होते.

Pune City
Pune : पुलाच्या बांधकामात सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरातीमागून घोडे

येथील पादचारी पूल आणि जिन्याचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून मेट्रो स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून मोरवाडी चौक ओलांडून जावे लागत आहे. याबाबत अनेक प्रवाशांनी तक्रारी केल्या. मात्र, तीन वर्ष उलटले तरीदेखील हा पूल आणि जिना बनला नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

अखेर मेट्रो प्रशासनाला जाग आली आणि अपूर्ण पादचारी पुलाचे काम काही महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, येत्या दोन महिन्यांत प्रवाशांना या पुलाचा वापर करता येणार आहे.

‘‘पुलाचे काम करताना बऱ्याचवेळा रस्ता बंद ठेवावा लागत होता. त्यासाठी परवानगी घेताना आणखी विलंब होत गेला. येत्या दोन महिन्यांत पुलाचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे लवकरच पिंपरी येथील प्रवाशांना या पुलाचा आणि जिन्याचा वापर करता येणार आहे.

- डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, महामेट्रो

Tendernama
www.tendernama.com