Pune : कात्रज-कोंढवा रस्ता आतातरी घेणार मोकळा श्वास?; 140 कोटी महापालिकेच्या खात्यात जमा

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कात्रज-कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने १४० कोटी रुपये देण्याचा आदेश काढला होता. मात्र, हा निधी महापालिकेच्या खात्यात जमा होण्यास विलंब झाला असला तरी आता तो निधी जमा झाला असून, कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाला गती येणार आहे. राज्य सरकारकडून महापालिकेच्या खात्यात हा निधी वर्ग करण्यात आला असून हा निधी प्रामुख्याने भूसंपादनासाठी वापरण्यात येणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

Pune
Pune : महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या तब्बल 'एवढ्या' जागा रिक्त

दक्षिण पुण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कात्रज-कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला होता. भूसंपादन न करता भूमीपूजन करुन काम सरू केल्याने जागेअभावी सदर प्रकल्पाचे काम रखडले होते. भूमीपूजन होऊन पाच ते सहा वर्षे उलटली तरी केवळ ३५ टक्केच काम झालेले आहे. भूसंपादनाअभावी रखडलेल्या कामास गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार योगेश टिळेकर यांच्या पाठपुराव्याने रस्त्यासाठी २०० कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर जवळपास दीड वर्षानंतर मार्च २०२४ मध्ये २०० कोटीऐवजी १३९ कोटी रुपये महापालिकेला देण्याचा आदेश राज्य सरकारने काढला आणि त्यानंतर आता हा निधी जमा करण्यात आला आहे. सकाळने निधी मिळत नसल्याच्या गोष्टीकडे लक्ष वेधताना लोकप्रतिनिधींनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे नमूद करत पाठपुरावा केला होता.

Pune
Muralidhar Mohol : Pune Airport च्या नव्या टर्मिनलबाबत मंत्री मोहोळांनी काय दिली गुड न्यूज?

रस्त्याचे काम भूसंपादनामुळे रखडले होते. अनेक ठिकाणी आम्ही तडजोडीतून जागा ताब्यात घेतल्या होत्या. मात्र, काही मिसिंग लिंकसाठी पैशांची गरज होती. आता पैसे जमा झाल्याने भूसंपादनाच्या कामाला गती देण्यात येईल. त्यानंतर रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे घेऊन जाता येईल. - राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com