Muralidhar Mohol
Muralidhar MoholTendernama

Muralidhar Mohol : Pune Airport च्या नव्या टर्मिनलबाबत मंत्री मोहोळांनी काय दिली गुड न्यूज?

Published on

Pune Airport News Terminal पुणे : लोहगाव विमानतळावरील (Lohegaon Airport) नवे टर्मिनल प्रवासी वाहतुकीसाठी लवकरच खुले होईल, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी सांगितले.

Muralidhar Mohol
पुणे, पिंपरीमधील 600 सोसायट्यांना मिळेना हक्काच्या जागेची मालकी

मोहोळ यांनी दिल्लीहून पुण्यात आल्यानंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नव्या टर्मिनलचे उद्‍घाटन होऊन सुमारे चार महिने उलटले आहेत, पण सुरक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) जवान उपलब्ध नसल्याने याचा वापर करता येत नव्हता.

Muralidhar Mohol
‘पुरंदर उपसा’साठी 4200 कोटींची तरतूद; शेतकऱ्यांसाठी वरदान

याबाबत मोहोळ म्हणाले, ‘‘या टर्मिनलवरून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी म्हणून पाठपुरावा केला होता. जवान उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली होती. त्यानंतर पुणे विमानतळासाठी जवानांच्या सात पदांवरील २२२ जागांना मंजुरी मिळाली. जवानांची संख्या ७१५ वर गेली आहे. त्यामुळे टर्मिनल सुरू करण्यात कोणताही अडथळा नाही.’’

Muralidhar Mohol
'त्या' पेट्रोल पंप चालकाकडून मार्गदर्शक सूचनांची पायमल्ली; पंप चालकाविरोधात तक्रार

लोहगाव विमानतळाची धावपट्टी वाढविण्याची शक्यता तपासणी ‘ओएलएस’ सर्वेक्षणाला परवानगी मिळाली आहे. पार्किंग बे वरील अपघातग्रस्त विमान संरक्षण दलाच्या जागेत हलविण्यात आले. या दोन्ही विषयांसंदर्भात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यामुळे हे प्रश्‍न सुटले, असेही मोहोळ यांनी नमूद केले.

Tendernama
www.tendernama.com