Pune : महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या तब्बल 'एवढ्या' जागा रिक्त

Pune
PuneTendernama

पुणे (Pune) : पुणे महापालिकेतील (Pune Municipal Corporation) पाच उपायुक्त पदाच्या जागा रिक्त असून, तेथे नवे अधिकारी नियुक्त करण्यात आलेले नाहीत. असे असताना आता अतिरिक्त आयुक्त पदाच्या (Post of Additional Commissioner) तीन पैकी दोन जागा रिक्त आहेत. राज्य शासनाने तेथे भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती न केल्याने महापालिका प्रशासनावर कामकाजावर परिणाम होत आहे.

Pune
Mumbai Pune Haydrabad Highspeed Train : मुंबई-पुणे-हैदराबाद अवघ्या साडेतीन तासांत! स्वप्न कधी प्रत्यक्षात येणार?

पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदाच्या तीन जागा आहेत, त्यातील अतिरिक्त आयुक्त विशेष या पदावर विकास ढाकणे हे कार्यरत होते. त्यांची लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) आचारसंहितेमुळे बदली करण्यात आली. ही जागा गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. समाज विकास, भूसंपादन, पथ, विधी यासह अनेक महत्त्वाची खाती अतिरिक्त आयुक्त विशेष यांच्याकडे आहेत, पण ही जागा रिक्त असल्याने सध्या याचा अतिरिक्त कार्यभार खुद्द आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडेच आहे. अतिरिक्त आयुक्त (जनरल) रवींद्र बिनवडे यांची नुकतीच कृषी आयुक्त पदी बदली झाली. त्यानंतर या पदासाठी राज्यातील काही आयएएस अधिकाऱ्यांची नावे चर्चेत असून, त्यात महिला अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. पण बिनवडे यांची बदली होऊन चार दिवस उलटून गेले, तरीही अद्याप नियुक्तीचा आदेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर पृथ्वीराज बी. पी. हे एकमेव अधिकारी कार्यरत आहेत.

Pune
Pune Ring Road News : पुणे रिंगरोडबाबत सरकारने काय घेतला मोठा निर्णय?

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी राज्य शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या पाच उपायुक्तांची बदली करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले नसल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये पाच जणांच्या कामाचे वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे कामावर ताण निर्माण होत आहे, निर्णय प्रक्रिया मंदावली असल्याने नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रतिक्षा आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पृथ्वीराज यांच्याकडेही अतिरिक्त कार्यभार

बिनवडे यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी कोणत्या अधिकाऱ्यांकडे द्यायची याचा निर्णय आयुक्त त्यांच्या अधिकारात घेतात. पण, यावेळी राज्य शासनाकडून बिनवडे यांच्या खात्याचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्याकडे देण्यात यावा, असे आदेश नगरविकास विभागाच्या उपसचिव प्रियांका छापवाले यांनी स्वतंत्रपणे काढले आहेत. त्याचीही प्रशासनात चांगलीच चर्चा रंगली आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com