Mumbai Pune Expressway वर आता लेन कटिंग पडणार महागात! 'या' ठिकाणी असतील तब्बल 430 कॅमेरे

Expressway
ExpresswayTendernama

पुणे (Pune) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Expressway) ‘आयटीएमएस’ (इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम - ITMS) बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. ९४.५ किलोमीटरच्या या मार्गावर १०६ ठिकाणी ४३० कॅमेरे बसविण्यात येत आहेत. सध्या कॅमेऱ्यांसाठी ऑप्टिकल केबल टाकण्याचे काम सुरू आहे. ऑक्टोबर अखेरपर्यंत हे काम चालणार असून, नोव्हेंबरमध्ये ‘आयटीएमएस’ प्रणाली कार्यान्वित होईल.

Expressway
Nagpur : माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार; 20 कोटींच्या गैरव्यहाराचा आरोप

द्रुतगती मार्गावर अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, म्हणून सुमारे ३४० कोटी रुपये खर्चून ‘आयटीएमएस’ प्रणालीचा वापर केला जात आहे. ही प्रणाली वाहनांच्या वेगावर लक्ष ठेवून असेल, त्यासाठी १०६ ठिकाणे निवडली आहेत. ४३० कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाईल. ड्रोनचीदेखील मदत घेतली जाणार आहे. कुसगाव येथे नियंत्रण कक्ष स्थापन केला असून, लवकरच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

‘आरटीओ’चे निरीक्षक व महामार्ग पोलिसांचे पथकही नियंत्रण कक्षात काम करेल. वाहन वेगाने चालविणे, लेन कटिंग करणे आदींसह एकूण १७ प्रकारच्या वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली जाणार आहे.

Expressway
Nashik : सीईओंच्या नव्या पावित्र्याने झेडपीतील टक्केवारी पुन्हा चर्चेत

‘आयटीएमएस’ म्हणजे काय?

‘आयटीएमएस’ म्हणजे ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’. या सिस्टीमच्या माध्यमातून वाहतुकीचे नियंत्रण सॅटेलाइटद्वारे होईल. यामध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीची नोंद ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाईल. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोचेल. संपूर्ण रस्त्यावर ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांचे जाळे असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील.

Expressway
Ajit Pawar : पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत अजितदादांनी दिली Good News!

‘आयटीएमएस’ महत्त्वाची का?

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’ प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाहतुकीची शिस्त पाळली जावी, अपघात टळावे, अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, पथकर वसुली जलद, अचूक अन् पारदर्शक व्हावी यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यासाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे वाहनांवर लक्ष ठेवतील. वाहनांचा वेग तपासणारी ‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टीम’, तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांचा शोध घेणारी ‘लेन डिसिप्लीन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टीम’ असल्याने अपघात कमी होण्यास मदत होईल.

Expressway
Nitin Gadkari : नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींचे मोठे विधान; म्हणाले...

मार्गावर १४ ब्लॅक स्पॉट!

द्रुतगती मार्गावर व जुन्या महामार्गावर एकूण १४ ठिकाणी ब्लॅक स्पॉट (अपघात प्रवण क्षेत्र) असल्याचा अहवाल राज्याच्या परिवहन विभागाने दिला आहे. ‘एमएसआरडीसी’कडून काही ब्लॅक स्पॉटवर काही प्रमाणात काम झाले आहे, तर काही ठिकाणी काम होणे बाकी आहे.

Expressway
Nashik : घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी आता महापालिकेचे आउटसोर्सिंग

द्रुतगती मार्गावर ‘आयटीएमएस’चे काम प्रगतिपथावर असून, ऑक्टोबर अखेरपर्यंत काम चालेल, नोव्हेंबरमध्ये ही प्रणाली कार्यान्वित होईल. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रणाली महत्त्वाची ठरेल.

- संजय यादव, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com