Ajit Pawar : पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत अजितदादांनी दिली Good News!

Ajit Pawar
Ajit PawarTendernama

मुंबई (Mumbai) : पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वाचा असणारा पुणे-नाशिक रेल्वेमार्ग (Pune - Nashik Railway Project) पूर्ण करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या अनुषंगाने पुणे-नाशिक रेल्वेमार्ग हा मेट्रो कायद्यानुसार पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव परिवहन विभागाने मंत्रिमंडळासमोर आणावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यासंदर्भातील बैठकीत दिले.

Ajit Pawar
Nashik : मनमाडच्या एमआयडीसीसाठी होणार 177 हेक्टर भूसंपादन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे-नाशिक ग्रीनफिल्ड ब्रॉडगेज हायस्पीड ररेल्वेमार्गासंदर्भात मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीस आमदार अतुल बेनके, मुख्य सचिव मनोज सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, व्यवस्थापकीय संचालक (महारेल) राजेशकुमार जैसवाल आदी उपस्थित होते.

Ajit Pawar
मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील अनधिकृत बांधकामांमागे 'लेडी डॉन'चा कहर

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे-नाशिक रेल्वेमार्ग करण्याबाबत गेल्या २५ वर्षांपासूनची मागणी आहे. मात्र, विविध कारणांमुळे हा मार्ग तयार करण्याचे काम रेल्वेला शक्य झाले नाही. त्यामुळे हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी त्यातील अडचणी दूर कराव्यात. तसेच हा मार्ग मेट्रो कायद्यानुसार महारेलच्या माध्यमातून पूर्ण करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले. 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com