Nitin Gadkari : नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींचे मोठे विधान; म्हणाले...

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama

नागपूर (Nagpur) : देशात 8 लाख दंतचिकित्सक तयार करण्याची आणि दंत विज्ञानातील कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्याची गरज आहे, ज्यामुळे प्रतिभावंतांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. बाजारात सहज उपलब्ध होणारे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ, जाहिरातींचा मोह आणि एकदा चाखण्याची हौस यामुळे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू व खऱ्याचे सेवन वाढत आहे. त्यामुळे तोंडाच्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या आजारांवर वेळेवर उपचार करण्यासाठी प्रत्येक गावात दंतवैद्याची गरज आहे. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात तोंडाच्या पूर्व कर्करोगाच्या तपासणी व उपचारासाठी उचललेले पाऊल कौतुकास्पद आहे. कर्करोगाच्या आजारांवर स्वदेशी उपचार करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले.

Nitin Gadkari
Nagpur : माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंच्या अडचणी वाढणार; 20 कोटींच्या गैरव्यहाराचा आरोप

तिन्ही विभागात अत्याधुनिक उपकरणे

मुखाच्या कर्करोगाचे वेळेवर निदान व उपचार करण्यासाठी शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात (दंत) अत्याधुनिक मशीन बसविण्यात आल्या आहेत. शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दंत रुग्णालयातील तीन नवीन युनिटचे उद्घाटन केले. नवीन युनिट्समध्ये 'टोबॅको सेसेशन सेंटर', 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ओरल प्री-कॅन्सर अँड कॅन्सर' आणि 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रिजनरेटिव्ह पीरियडॉन्टोलॉजी' यांचा समावेश आहे.

यावेळी माजी आमदार आशिष देशमुख, आदिवासी विभागाचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, शासकीय दंत महाविद्यालयाचे डीन डॉ. अभय दातारकर, शासकीय आयुर्वेद रुग्णालयाच्या डीन डॉ. मंजुषा वऱ्हाडपांडे, डॉ. सुभाष राऊत आदी उपस्थित होते. संचालन डॉ. वैभव कारेमोरे यांनी केले. माजी डीन डॉ. विनय हजारे यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात करण्यात आले.

Nitin Gadkari
Nashik : सीईओंच्या नव्या पावित्र्याने झेडपीतील टक्केवारी पुन्हा चर्चेत

मॉनिटरने व्यसनाची होते माहिती 

डॉ. रवींद्र ठाकरे म्हणाले की, आदिवासी व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये दातांच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. सर्वेक्षणादरम्यान धक्कादायक आकडेवारी समोर आली, त्यामुळे त्यांची नियमित तपासणी आणि उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. गंभीर आजार असल्यास दंत चिकित्सालयाची मदत घेतली जात आहे. विभागप्रमुख डॉ. प्रशांत पांदलीवार म्हणाले की, 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर ओरल प्री-कॅन्सर, कॅन्सर' युनिटच्या 'ओटू' उपचार पद्धतीमुळे तोंडाचा कर्करोग आणि तोंडाच्या कर्करोगावर उपचार करणे सोपे झाले आहे. 20 मिनिटांच्या लेझर उपचारामुळे रुग्ण 15 दिवसांत निरोगी होऊ शकतो.

Nitin Gadkari
Ajit Pawar : पुणे-नाशिक रेल्वे मार्गाबाबत अजितदादांनी दिली Good News!

कृत्रिम हाडांचे निर्माण

ओरल मेडिसिन आणि रेडिओलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. अशिता कळसकर यांनी सांगितले की, दंत चिकित्सालयाच्या तळमजल्यावर तंबाखूमुक्ती केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रातील कार्बन मोनोऑक्साइड (सीओ) मॉनिटर मशीन काही मिनिटांत व्यक्तीच्या व्यसनाच्या पुराव्याची माहिती देते.

डॉ. विवेक ठोंबरे यांनी सांगितले की, दातांच्या आजारांमध्ये दात किडण्याचे प्रमाण वाढले आहे. काही वेळा कृत्रिम दात बसवण्यासाठी पुरेशा प्रमाणात हाडे उपलब्ध नसतात. त्याच्या उपचार आणि संशोधनासाठी 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर रिजनरेटिव्ह पीरियडॉन्टोलॉजी' हा विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात दातांसाठी कृत्रिम हाडे बनवता येतात. राज्यातील हे पहिले केंद्र आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com