पीएमपीने दिली Good News! पुणेकरांचा प्रवास होणार अधिक सुरक्षित

Pune PMP Bus: देशातील पहिली स्मार्ट बस पुण्यात तयार करण्यात आली असून, त्यासाठी पीएमपीने मोठे पाऊल उचलले आहे
smart buses from PMP Pune
PMPTendernama
Published on

पुणे (Pune) : पीएमपी (PMP) प्रशासनाने पुणेकरांसाठी एक खुश खबर दिली आहे. पुणेकरांचा पीएमपीचा प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. त्यासाठी पीएमपीने एक पाऊल पुढे टाकले आहे. (Smart Buses Pune PMP News)

smart buses from PMP Pune
राज्याच्या आर्थिक स्थितीवर परिणाम करणारा ‘शक्तिपीठ’ रद्द करा; विरोधकांचा एल्गार

चार कोटींचा खर्च

प्रवासी वाहतुकीचा दर्जा सुधारण्यासाठी, तसेच प्रवाशांची सुरक्षा वाढविण्यासाठी व संख्या मोजण्यासाठी पीएमपी (PMP) प्रशासन बसमध्ये ‘एआय’ कॅमेऱ्यांचा (AI Camera) वापर करणार आहे. प्रत्येक बसमध्ये चार कॅमेरे बसविले जाणार आहेत. एकूण १६५० बसमध्ये सहा हजार ६०० कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पुढील आठवड्यात याच्या टेंडर (Tender) प्रक्रियेला सुरवात होणार आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्रालयाकडून मंजुरी मिळेल असे ‘पीएमपी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पीएमपी प्रशासनाने काही दिवसांपूर्वी बसमध्ये ‘एआय’ कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याची चाचणीदेखील घेण्यात आली. ती यशस्वी झाल्यानंतर आता प्रत्यक्षात कॅमेरे बसविले जाणार आहेत. त्यासाठी टेंडर प्रक्रिया पुढील आठवड्यापासून राबवली जाणार आहे. पीएमपी स्वतःच्या व भाडेतत्त्वावरील अशा दोन्ही प्रकारच्या बसमध्ये कॅमेरे बसविणार आहे.

smart buses from PMP Pune
Pune Nashik Highway Traffic: पुणे-नाशिक महामार्गावरील कोंडी का फुटेना? काय आहेत कारणे?

‘एआय’चा वापर करणारी पहिली संस्था

पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या तक्रारी कमी करण्यासाठी हायटेक मार्ग स्वीकारला आहे. प्रत्येक बसमध्ये चार कॅमेरे बसविले जाईल. यात एक कॅमेरा स्टिअरिंगजवळ लावण्यात येईल. त्यामुळे चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे. अन्य कॅमेरे बसमधील समोरच्या व शेवटच्या भागात असतील. प्रवाशांची संख्या मोजण्यासाठी याचा वापर होईल.

सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या बसमध्ये ‘एआय’चा वापर करणारी पीएमपी ही देशातील पहिलीच प्रवासी वाहतूक करणारी संस्था ठरणार आहे. राज्य परिवहन महामंडळानेदेखील स्मार्ट बसमध्ये ‘एआय’चा वापर करणार असल्याचे जाहीर केले. मात्र त्यासाठी आणखी काही महिने वाट पाहावी लागणार आहे.

smart buses from PMP Pune
Pune ZP: 54 ठेकेदार ब्लॅकलिस्टेड! पुणे झेडपीने का केली कारवाई?

‘एआय’चा वापर का?

- महत्त्वाच्या मार्गावर विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवाशांची मोठी गर्दी असते

- काही प्रवासी गर्दीचा गैरफायदा घेत विनातिकीट प्रवास करतात

- ‘एआय’ कॅमेरा प्रवाशांची संख्या मोजून त्याचा संदेश वाहकाला देईल

- त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्याला चाप बसेल

smart buses from PMP Pune
Pune Airport Accident: 'ती' धडक अन् विमानातील प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला! नेमकं काय झाले?

चालकांवर नजर

- स्टिअरिंगजवळ कॅमेरा लावल्याने बस चालविताना चालकाला डुलकी लागत आहे का?

- चेहऱ्यावरील हावभाव कॅमेऱ्यात कैद होईल

- चालकाला काही त्रास होतो आहे का? तो रागात आहे का? हेदेखील पहिले जाईल

- चालकाला झोप येत असेल तर अलार्म सिस्टीमद्वारे प्रशासनाला समजेल.

smart buses from PMP Pune
Pune: पुणे शहरातील किती पूल बनलेत धोकादायक? आयुक्त म्हणतात...

पीएमपी बसमध्ये ‘एआय’आधारित कॅमेरे लवकरच बसविले जातील. पुढील आठवड्यात याच्या टेंडर प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. प्रत्येक बसमध्ये चार कॅमेरे बसविले जाणार आहेत. यासाठी सुमारे चार कोटींचा खर्च आहे.

- नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com