Pune : आयटीयन्स खूशखबर! हिंजवडी 'आयटी हब' लवकरच शिवाजीनगरला जोडणार

Pune City
Pune CityTendernama
Published on

पुणे (Pune) : हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील पुणे मेट्रो लाईन-३ च्या उभारणीमुळे पुणेकरांना सुलभ, वेगवान व किफायतशीर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे काम सध्या वेगाने सुरू असून लवकरच हिंजवडीचे ‘आयटी हब’ शहराच्या मध्यभागातील शिवाजीनगरला जोडले जाणार आहे.

Pune City
NHAI : पागोटे ते चौक 29 किलोमीटर ग्रीन कॉरिडॉर; 3500 कोटींचा प्रस्ताव

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने हाती घेतले आहे. त्यांच्या ‘ट्रिल अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ आणि सिमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स यांचा समावेश असलेल्या ‘कन्सोर्टियम’ला प्रदान करण्यात आला आहे. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल)’ या कंपनीची स्थापना केली आहे. पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेडच्या बिझनेस हेड आणि संचालिका नेहा पंडित यांनी नुकतीच ‘सकाळ’ कार्यालयाला भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी अनौपचारिक संवाद साधला. यावेळी पुणेकरांसाठी या प्रकल्पाचे असलेले महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. तसेच शहरातील नागरिकांच्या सुविधेसाठी, त्यांना प्रवासाची उत्तम अनुभूती मिळावी यासाठी ‘पुणे मेट्रो लाईन ३’मध्ये किती विचारपूर्वक काम करण्यात येत आहे, याची माहिती त्यांनी दिली.

Pune City
Mumbai : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला मोठा बूस्टर

६० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण

नेहा पंडित म्हणाल्या, ‘‘शहरातील नागरिकांना सध्या वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे. त्यातून त्यांना दिलासा मिळावा म्हणून ‘पुणे मेट्रो लाईन ३’चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. बालेवाडी, बाणेर, गणेशखिंड रस्ता अशा पुण्यातील अतिशय महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या भागातून मेट्रो प्रकल्प उभारणे आव्हानात्मक असते. तरीही अशा विविध आव्हानांवर मात करत ६० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.’’

वेळेची बचत होणार

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन असले तरी, अपरिहार्य आव्हानांमुळे यामध्ये बदल होऊ शकतो. परंतु एकदा या मार्गातून ‘पुणेरी मेट्रो’ सुरू झाली की सध्या शिवाजीनगर ते हिंजवडी प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होऊन सुमारे ३५ ते ४० मिनिटांवर येईल, असेही पंडित यांनी स्पष्ट केले.

Pune City
Pune : ...तर दुचाकी चालविणाऱ्या पुणेकरांना भरावा लागणार दोन हजारांचा दंड; कारण काय?

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो

१) गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत तडजोड न करण्याचे टाटा समूहाचे धोरण

२) ‘पुणेरी मेट्रो’ संपूर्णतः प्रवासीकेंद्रित करण्याकडे कटाक्ष

३) या मेट्रो मार्गावर प्रवाशांना कार्यक्षम, सुरक्षित आणि सुखद अनुभव मिळणार

४) घरातून मेट्रोपर्यंत प्रवाशांना पोचण्यासाठी समग्र सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन

दृष्टिक्षेपात...

- हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प २३ किलोमीटरचा

- हा प्रकल्प संपूर्ण उन्नत (एलिव्हेटेड) आहे

- या प्रकल्पाचा प्रारंभिक नियोजित खर्च ७४२० कोटी रुपये होता

- पुणे आयटीसिटी मेट्रो रेल लिमिटेड कंपनी ३५ वर्षे या प्रकल्पाचे संचलन करेल

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com