NHAI : पागोटे ते चौक 29 किलोमीटर ग्रीन कॉरिडॉर; 3500 कोटींचा प्रस्ताव

NHAI
NHAITendernama
Published on

मुंबई (Mumbai) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेएनपीए उरण पागोटे चिरनेर चौक असा २९ किलोमीटर लांबीचा ६ पदरी ग्रीन कॉरिडॉर महामार्ग प्रस्तावित केला आहे. येत्या तीन वर्षांत या रस्त्याचे काम पूर्ण होणार असून, त्यासाठी ३,५०० कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. सध्या या प्रस्तावित डीपीआरचे काम सुरू असून लवकरच या कामासाठी टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे.

NHAI
करंजा ते रेवस अर्ध्या तासात; 'ऍफकॉन्स' 3 वर्षात बांधणार 2 किलोमीटर पूल

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई अटल सेतू, मुंबई – गोवा आपटा रसायनी जेएनपीएदरम्यान होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी हा प्रस्तावित रस्ता अगदी सुलभ, सोयीचा ठरणार आहे. तसेच हा रस्ता एनएच ६६, एनएच ४८ आणि एनएच ३४८ ला जोडण्यात येणार असल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न मिटणार आहे.

NHAI
Mumbai : ‘त्या’ 25 इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडाचे टेंडर

पागोटे – चौकदरम्यान उभारण्यात हा महामार्ग गोवा आणि बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत मुंबईहून बंगळुरूदरम्यानचा प्रवास सुलभ होणार आहे. या सहा पदरी ग्रीन कॉरिडॉर महामार्गातील चिरनेर आणि आपटादरम्यान दोन ठिकाणी टनेल उभारण्यात येणार आहेत. चिरनेर टनेलची लांबी १.९ किलोमीटर तर आपटा टनेलची लांबी १.७ किलोमीटर असणार आहे. तसेच या मार्गावर ६ मोठे आणि ५ लहान पूल उभारण्यात येणार आहेत. त्याशिवाय सर्व्हिस रोड, स्लिप रोडचा समावेश करण्यात येणार आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर सूरत - नाशिक - पुणे चेन्नईदरम्यान रिंग रोड तयार होणार आहे.

NHAI
Mumbai : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला मोठा बूस्टर

२९ किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित ६ पदरी ग्रीन कॉरिडॉर महामार्गाच्या प्रस्तावित कामाचे डीपीआरचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानंतर लवकरच या कामासाठी टेंडर मागवले जाईल. वर्क ऑर्डर झाल्यानंतर त्यापुढील ३० महिन्यांच्या मुदतीत हे काम पूर्ण करावे लागणार आहे. या प्रस्तावित रस्त्यामुळे मार्गावरील वाहतूककोंडी दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.
- यशवंत घोटकर, उपसंचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com