Mumbai : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या कामाला मोठा बूस्टर

Thane to Borivali
Thane to BorivaliTendernama
Published on

मुंबई (Mumbai) : ठाणे-बोरिवली या दुहेरी बोगद्याच्या कामाला वेग येणार आहे. ठाणे ते बोरिवली या मार्गावरील दुहेरी बोगद्याच्या बांधकामासाठी 35 हेक्टर वनजमीन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) नुकतीच वळती करण्यात आली आहे. ठाण्याच्या दिशेने ५ तर बोरिवलीच्या दिशेने एका गावातील जमिनीचा यामध्ये समावेश आहे. या बोगद्यामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर अवघ्या 12 मिनिटांत गाठता येणार आहे. तसेच हा प्रकल्प देशातील सर्वात लांब भुयारी मार्ग ठरणार आहे.

Thane to Borivali
Mumbai-Goa Highway : मुंबई - गोवा प्रवास करताय? मग ही बातमी वाचाच! कशेडी बोगदा...

मुंबईतील पश्चिम उपनगराला थेट ठाणे शहरासोबत जोडण्यासाठी ठाणे - बोरिवली हा दुहेरी बोगदा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. तसेच ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 16,600 कोटी रुपये खर्चाच्या ठाणे बोरिवली बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन जुलै महिन्यात करण्यात आले. ठाणे ते बोरीवली हे अंतर घोडबंदर मार्गे 23 किलोमीटर इतके आहे. हे अंतर पार करण्यासाठी सद्य:स्थितीत सकाळी व संध्याकाळी रहदारीच्या वेळी अंदाजे 1 ते दीड तास वेळ लागतो, इतर वेळी किमान 1 तास वेळ लागतो.

Thane to Borivali
Mumbai : विरार ते अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरला मिळणार वेग

ठाणे ते बोरिवली दरम्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अंतर्गत दुहेरी बोगद्याचे बांधकाम प्रस्तावित आहे. त्यामुळे ठाणे ते बोरीवली हा प्रवास 12 किलोमीटरने कमी होईल. बोगद्याचा भाग हा संरक्षित वन क्षेत्रातून जात असल्याने बोगद्याच्या खोदकामासाठी कोणते तंत्रज्ञान वापरणे योग्य होईल याकरीता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रोक मेकॅनिक्स (National Institute of Rock Mechanics) यांनी टनेल बोअरिंग मशीन (Tunnel Boring Machine) च्या सहाय्याने बोगद्याचे खोदकाम करण्याचे सूचविले आहे.

Thane to Borivali
Mumbai Pune Expressway : 'द्रुतगती'वरून जाणाऱ्या 5 लाख वाहनांना 'दणका'

या मार्गिकेच्या 11.8 कि.मी. लांबीपैकी 4.43 कि.मी. लांबी ही ठाणे जिल्ह्यातून व 7.4 कि.मी लांबी ही मुंबई उपनगर जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. एकूण 6 गावांपैकी 3 (चितळसर मानपाडा-ठाणे, माजिवाडा-ठाणे व मागाठाणे- बोरीवली) गावांमध्ये संयुक्त मोजणी ही थेट खरेदी पध्दतीने करण्याचे प्रस्तावित आहे. उर्वरित 03 गावे म्हणजेच (बोरीवाडे, चेणे आणि येउर-ठाणे) शासकीय वनक्षेत्रातून जात आहेत. यासाठी एकूण 49.48 हेक्टर भूसंपादन आवश्यक आहे. यापैकी अंदाजे 37.63 हेक्टर शासकीय वन क्षेत्र व 11.91 हेक्टर खाजगी जमीन आहे.

दुहेरी बोगद्याची वैशिष्ट्ये :
एकूण लांबी : 11.80 कि.मी. (बोगद्याची एकूण लांबी 10.25 कि.मी. व जोडरस्त्याची लांबी 1.55 कि.मी. आहे)
बोगद्याचा व्यास : 12.2 मी (2 मार्गिकेचा असे 2 बोगदे)
प्रत्येक 300 मी. येथे आंतरजोड मार्गिका ( cross connection ) आहे
अग्निशमन यंत्र, पाण्याची नाळी, धुरांचे डिटेक्टर, प्रकाशित प्रतिबिंब (LED Light sign boards) योग्य ठिकाणी स्थापित केले जातील
या प्रस्तावित नवीन कनेक्टिव्हिटीमधील वाहतुकीचे अंदाजे प्रमाण 50,000 पी.सी.यू आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com