
मुंबई (Mumbai) : मुंबई - गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Expressway) कशेडी बोगदा (Kashedi Tunnel) तब्बल १५ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांना आता कशेडी घाट मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.
कशेडी बोगद्याकडे जाणाऱ्या पुलाचे गर्डर बाजूला करण्याचे काम सध्या या ठिकाणी सुरू असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. वाहनांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन बोगदा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यापूर्वी देखील अनेकवेळा विविध कामाच्या निमित्ताने हा बोगदा बंद ठेवण्यात आला होता.
कशेडी घाटाला पर्याय म्हणून या बोगद्याची निर्मिती करण्यात आली आहे. पण, कामानिमित्त बोगदा बंद ठेवल्याने आता प्रवाशांना पर्यायी कशेडी घाटाचा वापर करावा लागणार आहे. रविवारपासूनच (२४ नोव्हेंबर) या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
गर्डर बाजूला करण्याच्या कामात संभाव्य धोका लक्षात घेऊन बोगदा बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे. तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी अलीकडेच कशेडी बोगद्याचे उद्घाटन करून तो वाहतुकीसाठी खुला केला होता.