मोठी बातमी! ऐन उन्हाळ्यात पुण्याला पाणीटंचाईच्या झळा! काय आहे कारण?

Pune, PMC
Pune, PMCTendernama
Published on

पुणे (Pune) : धरणात मुबलक पाणी असल्याने जुलैपर्यंत पाणीकपात होणार नाही, असा दावा एकीकडे महापालिकेने केला आहे आणि दुसरीकडे अपुऱ्या आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे भर उन्हाळ्यात टँकरचालकांची 'दिवाळी' सुरू झाली असून, एक हजार रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत टँकर विकून नागरिकांची प्रचंड लूट केली जात आहे.

Pune, PMC
...तर विकासकामे रोखणार! राज्यातील ठेकेदार फडणवीस सरकारवर का संतापले?

शहरासह उपनगरातील केलेल्या पाहणीत या आणि अशा अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. समाविष्ट गावांमध्ये तर अक्षरक्षः अशुद्ध पाणीपुरवठा केला जात आहे. एकप्रकारे टँकरचालकांच्या मनमानीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

समान पाणीपुरवठ्याची प्रतीक्षा

खडकवासला आणि भामा आसखेड या धरणांतून पुणे शहराला रोज १७०० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढल्याने धरणातून पाणी उचलण्याचे प्रमाण १० ते १५ टक्क्यांनी वाढले आहे. शहरातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळाले पाहिजे, यासाठी सुमारे २४०० कोटी रुपये खर्चून समान पाणीपुरवठा योजनेचे काम २०१८ पासून सुरू आहे.

हे काम अद्यापही पूर्ण झाले नसून, या प्रकल्पाची मुदत मार्च महिन्यात संपल्यानंतर आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुण्यातील नागरिक त्यांचे समान आणि पुरेसे पाणी कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत.

Pune, PMC
Pune : पिंपरी मेट्रो मार्गावर आणखी एक स्टेशन प्रवाशांच्या सेवेत होणार दाखल

येथे आहे टंचाईचा प्रश्न

बाणेर, बालेवाडी, धायरी, आंबेगाव, नऱ्हे, कात्रज, बिबवेवाडी, महंमदवाडी, एनआयबीएम, उंड्री, पिसोळी, मांगडेवाडी, येरवडा, कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, पाषाण, औंध, शिवाजीनगर, सेनापती बापट रस्त्याची दोन्ही बाजू, डेक्कन जिमखाना, बोपोडी, वडगाव शेरी, टिंगरेनगर, कोंढवा, कात्रज, सिंहगड रस्ता परिसर, मध्यवर्ती पेठा.

अघोषित पाणीकपात

एकीकडे पुण्यात पाणीकपात केली जाणार नाही, असे महापालिकेकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अघोषित पाणीकपात केली जात आहे. मुबलक पाणी उपलब्ध असले तरी महापालिकेचे कर्मचारी कमी दाबाने पाणी सोडत आहेत. त्यामुळे सोसायट्यांच्या टाक्या भरत नाहीत, लवकर पाणी जाते, यामुळे सोसायटीतील नागरिक त्रस्त झाले आहेत.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत असल्याचे सांगितले जात आहे. पण प्रत्यक्षात असलेली वस्तुस्थिती अधिकारी मान्य करण्यास तयार नाहीत.

Pune, PMC
Pune : टीकेची झोड उठल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग; काय आहे प्रकरण?

मोफत टँकरची मागणी वाढली

- पुणे महापालिकेकडून पाणीटंचाईच्या काळात टँकरचे मोफत पाणी पुरविले जाते.

- एकीकडे टंचाई नाही, असे प्रशासन सांगत असताना दुसरीकडे या मोफत टँकरची मागणीही वाढली आहे.

- फेब्रुवारी महिन्यात महापालिकेने ३८ हजार ५२२ टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला.

- मार्च महिन्यात जवळपास ९ हजारांनी टँकरची मागणी वाढली. या काळात ४७ हजार ८९६ टँकरच्या फेऱ्या झाल्या.

- पुणे महापालिकेच्या स्वतःच्या मालकीचे २० टँकर आहेत.

- सुमारे ४० कोटी रुपयांच्या टेंडर काढून वर्षभरासाठी ठेकेदार नेमले आहेत.

- त्यांच्या टँकरची संख्या सुमारे २५० इतकी असून, प्रत्येक टँकरच्या सरासरी रोज ५ फेऱ्या होतात.

- महापालिकेतर्फे मोफत पाणीपुरवठा केला जात असताना त्यात ८० टक्क्यांपेक्षा जास्त ठेकेदाराच्या टँकरची संख्या आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com