Satara : अस्वच्छ जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटी कर्मचारी भरण्याचे टेंडर कधी निघणार?

Satara
SataraTendernama

सातारा (Satara) : जिल्हा शल्यचिकित्सकांच्या विनंतीला मान देत अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे पदाधिकारी व सभासदांनी जिल्हा रुग्णालयाची सफाई केली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून अस्वच्छतेने घेरलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या परिसराने मोकळा श्वास घेतला. संघटनेने सामाजिक बांधिलकीतून ही जबाबदारी पार पाडली असली तरी, जिल्हा रुग्णालयाच्या परिसराच्या स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने राबविणे आवश्यक आहे.

Satara
Devendra Fadnavis : राज्यातील 'या' शहरात उभे राहणार देशातील सर्वांत सुंदर मार्केट यार्ड

अनेक दिवसांनंतर झळाळी

सफाई कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे गेल्या काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयाच्या परिसराची सफाई ठप्प झाली होती. त्यामुळे सर्वत्र कचराच कचरा झाला होता. अगदी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय या फलकासमोरही कचऱ्याचे ढीग साठले होते. याबाबत माध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांनी काही परिसराची सफाई केली होती. संघटनेने पुढाकार घेतल्याने अनेक दिवसांनंतर जिल्हा रुग्णालय परिसराला झळाळी मिळाली.

Satara
Nagpur : 'या' रस्त्यावरील अतिक्रमण काढा मगच करा बांधकाम

सफाई मजदूर काँग्रेसचा पुढाकार

जिल्हा रुग्णालयाच्या अस्वच्छतेबाबत माध्यमांत वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी तसेच सामाजिक अधीक्षक सुहास गौर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती केली. त्यानुसार अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अशोक मारूडा, जिल्हाध्यक्ष सूरज ऊर्फ बबूली सोलंकी, शाखाध्यक्ष विकी खोकर, उपाध्यक्ष प्रेम सुनसुना, सचिव संदीप वाघेला यांच्यासह २० ते २५ सदस्यांनी जिल्हा रुग्णालय परिसराची स्वच्छता केली. बीएचसी पावडरची फवारणी केली. जिल्हा रुग्णालयात आरोग्यदायी वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे.

Satara
Mumbai Goa : मुंबई - कोकणाला जोडणार 'हा' सागरी महामार्ग; पुलांसाठी निघाले 3 हजार कोटींचे Tender

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे टेंडर कधी?

नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी सर्व रुग्णालयात तातडीने सुविधा पुरविण्याचे निर्देश दिले होते; परंतु दोन महिन्यांनंतरही मूलभूत गोष्टींची पूर्तता करण्यात शासन व प्रशासन अपयशी ठरले आहे. पालकमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पाहणी केली; परंतु उपाययोजना शून्यच आहेत. रुग्णालयाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटी कर्मचारी भरण्याबाबतचे टेंडरही अद्याप निघालेले नाही. त्यामुळे रुग्णालयात पुन्हा कचरा साठणारच आहे. ते टाळण्यासाठी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी कृती करणे आवश्यक आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com