Devendra Fadnavis : राज्यातील 'या' शहरात उभे राहणार देशातील सर्वांत सुंदर मार्केट यार्ड

Nitin Gadkari
Nitin GadkariTendernama
Published on

नागपूर (Nagpur) : व्यापारी व ग्राहकांसाठी विविध सुविधांचा समावेश करून तयार होणारे कळमना किराणा मार्केट यार्ड हे देशातील सर्वात सुंदर किराणा मार्केट यार्ड ठरेल व येथील किराणा व्यावसायिकांचा चौपट फायदा होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किराणा मार्केट यार्डच्या भूमिपूजन कार्यक्रमात व्यक्त केला.

Nitin Gadkari
Nagpur : दोन महिन्यांत राज्य सरकारचा उपराजधानीवर 800 कोटींचा का झाला वर्षाव?

दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनच्यावतीने येथील कळमना मार्केट यार्ड परिसरात उभारण्यात येणाऱ्या  किराणा मार्केट यार्डचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, दि नागपूर इतवारी किराणा मर्चंट्स असोसिएशनचे अध्यक्ष शिवप्रताप सिंह आदी यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, शहराच्या इतवारी भागात गजबजलेल्या जागेत असलेल्या किराणा बाजाराचा विस्तार करण्याच्या चर्चा बऱ्याच वर्षांपासून सुरू होत्या. मात्र, या संदर्भात ठोस असे काही घडत नव्हते. या किराणा बाजाराच्या स्थानांतरासाठी विविध ठिकाणांच्या नावाची चर्चा होत राहिली. मात्र, ते प्रत्यक्षात येऊ शकले नाही.

Nitin Gadkari
Nashik : इटलीतील 33 कोटींचे झाडू करणार नाशिकची स्वच्छता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी किराणा मार्केट यार्डची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी श्रम घेतले आणि किराणा मर्चंट असोसिएशनने त्यास चांगला प्रतिसाद दिला. परिणामी, येत्या काळात किराणा मार्केट यार्ड प्रत्यक्षात उभारले जाणार आहे. नासूप्रने या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून दिली असून, वीरेंद्र खरे यांनी यार्डचा उत्तम प्लॅन तयार केला, हेही कौतुकास्पद असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.      

किराणा मर्चंट असोसिएशनने नागपुरच्या सामाजिक व राजकीय जीवनात महत्त्वाचे योगदान दिले आहे. असोसिएशनच्या माध्यमातून इतवारी भागातील किराणा बाजार या मार्केट यार्डमध्ये पूर्णपणे स्थानांतरित होईल आणि कमीत-कमी वेळात या मार्केट यार्डचे बांधकाम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या मार्केट यार्डच्या विकासासाठी आवश्यक ती मदत राज्य सरकारच्यावतीने करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Nitin Gadkari
Nashik : अजित पवारांच्या सूचना अन् नाशिक-पुणे हायस्पीडच्या भूसंपादनाला येणार वेग

एम्प्रेस मिलच्या जागेवर टेक्सटाईल मार्केट

गीता मंदिरापुढील एम्प्रेस मिलच्या जागेवर टेक्सटाईल मार्केट प्रस्तावित आहे. येत्या एक दोन महिन्यांत काम सुरू होत आहे. केळीबाग रोड, महाल, गांधीबाग, इतवारीतील कपड्यांचा बाजार येथे स्थानांतरीत होईल. कळमना मार्केट यार्ड व टेक्सटाईल मार्केट तयार झाल्यास इतवारीत वाहतूक कोंडी होणार नाही, असे गडकरी म्हणाले.

चारपटीने व्यवसायात वाढ होईल

गेल्या अनेक वर्षांपासून इतवारी बाजार स्थानांतरीत करण्याबाबत केवळ चर्चा व्हायची. परंतु आता केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या प्रकल्पाला मूर्त स्वरुप दिले. देशातील सर्वांत सुंदर यार्ड तयार होईल. येथे चारपट व्यवसाय वाढेल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. या प्रकल्पासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com