बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने विकासकामांसाठी काढले ई-टेंडर

Belgaum

Belgaum

Tendernama

Published on

बेळगाव : कॅन्टोन्मेंट बोर्डाने विविध विकासकामांसाठी ई-टेंडर मागविली असून, २०२१-२२ व २०२२-२३ वर्षांसाठी हे टेंडर असणार आहे. २ फेब्रुवारीपासून हे टेंडर खुले करण्यात आले आहे. पात्र कंत्राटदारांकडून टेंडर मागविण्यात आले आहे.

<div class="paragraphs"><p>Belgaum</p></div>
नोंदणी महानिरीक्षकांचा आदेश धाब्यावर; करारनाम्याची चौकशी संथगतीने!

गुरुवारपासून (ता. ३) टेंडरसंबंधी कागदपत्रे डाऊनलोड व सबमीशन करता येणार आहे. मंगळवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता टेंडरपूर्वी बैठक होणार आहे. २२ फेब्रुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत कागदपत्रे सबमीशन करता येणार आहेत. तांत्रिक टेंडर २३ फेब्रुवारी दुपारी ४ वाजता खुले होणार आहे. तसेच फायनान्सिशल टेंडरसंबंधी (पात्र बिल्डर्ससाठी) ऑनलाईनद्वारे माहिती दिली जाईल, असे आवाहन बोर्डातर्फे करण्यात आले आहे.

<div class="paragraphs"><p>Belgaum</p></div>
शाहू समाधीस्थळाचे सौंदर्य खुलणार; देखभाल, दुरुस्तीसाठी टेंडर

या टेंडरमध्ये स्ट्रीट लाईन बदलणे, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळेत एलईडी दिवे बसविणे, ऑफीस कंपाऊंडमध्ये पंखे बसविणे यासाठी अंदाजे ८ लाख ५ हजार इतका खर्च देण्यात आला आहे. कॅन्टोन्मेंट अनुदानित इमारती, शाळा, कॉटर्स, समुदाय स्वच्छतागृह, डस्टबीन स्वच्छता, पार्क यांचे व्यवस्थापन अंदाजे ५० लाख रुपये खर्च टेंडरमध्ये दिला आहे. कॅन्टोन्मेंट क्षेत्रातील पदपथांची दुरुस्ती यामध्ये तिमय्या रोड, इनडिपेडन्स रोड, किल्ला परिसराचे व्यवस्थापन करणे. अंदाजे ५० लाख रुपये खर्च असेल असे टेंडरमध्ये म्हटले आहे. इच्छुकांनी https://defproc.gov.in/nicgep/app यावरून कागदपत्रे डाऊनलोड करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com