
Shahu Maharaj
Tendernama
कोल्हापूर (Kolhapur) : नर्सरी बागेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाधी बांधण्यात आली आहे. येथील देखभाल, दुरुस्तीसाठी टेंडर काढण्यात आले असून, पर्यटकांना अधिक सुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला आहे, असे महापालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
नर्सरी बागेतील शाहू महाराजांची समाधी स्थळ पर्यटांसाठी खुले करण्यात आले आहे. येथील मेघडंबरी, लॉन, हिरेटेज वॉल यांच्या देखभा दुरुस्तीसाठी महापालिकेने निविदा काढण्यात आली आहे. महापालिकेने साडेतीन कोटीच्या स्वनिधीतून या समाधी स्थळाची उभारणी केली. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत समाधीस्थळ पर्यटकांसाठी बंद होते. मात्र आता ते खुले करण्यात आले आहे. येथील सर्व वास्तू आणि या परिसराचे सौंदर्य अधिक वाढावे यासाठी देखभाल, सुरक्षा याचे आउटसोर्सिंग केले जाणार आहे. जेणे करून व्यावसायिक तत्वांवर ही सर्व कामे व्हावीत.
या परिसराची सुरक्षाही महत्वाची असून ते कामही खासगी कंपन्यांना दिले जाणार आहे. याचे टेंडर काढण्यात आले असून लवकरच याच्या देखभाल दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होईल. शुक्रवारी (ता.४) सकाळी ९.३० पासून शुक्रवारी (ता.१८) दुपारी ३.३० पर्यंत याचे टेंडर ऑनलाईन स्विकारले जाणार आहे. याचा टेंडर अर्ज https://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहे.